झांबेजी काठाची संध्याकाळ

बोस्वेल चे फोटो मिळाले या आनंदात दुपारी डोळ्याला डोळा लागला नाही . डोळे बंद केले की अजस्त्र हत्त्ती आपले सुळे कॅमेरा ला टेकवतोय असा भास होत होता, असा न झालं तरच नवल, १० फुटावर त्याच्या पायाशी झोपून फोटो काढल्यावर दुसर काय होणार . ! ३ वाजून गेले होते , मधू सुद्धा झोपला नव्हता , त्याला म्हणलं चल बाहेर निघू, तो पण तसा लगेच तयार झाला . कौशिक आणि सलील पण तिकडून आलेच , मॅश ला कॅम्प वरून घेऊ आणि झांबेजी नदी काठाकाठाने फिरू असा बेत केला.

माना पुल्स मध्ये झांबेजी नदीचं पात्र खूप मोठं आहे , उन्हाळयात ते बऱ्यापैकी कमी होतं , तरी अजस्त्र वाटतं . झांबेजी नदी च्या आसपास हत्ती आणि इतर प्राणी दिसायची शक्यता असतेच , आणि काही फ्रेम डोक्यात असतात त्यापैकी काही मिळतील ही पण एक शक्यता होती . संध्याकाळच्या वेळी येणारा सूर्य प्रकाश आणि त्यामध्ये भिजलेली झाडं, त्यात मनसोक्त फिरणारे हत्ती असं काहीसं मनातल्या मनात ठरत होतं.गाडी काढली , कॅम्प वरून मॅश ला घेतलं आणि आम्ही नदीकाठ जवळ करू लागलो . मॅश म्हणाला are you guys not tired and done with photos ? You almost touched boswell today ..? आम्ही एकसुरात म्हणालो, we are done with boswell , not with manapools ..आमच्या हसण्यात तोही सामील झाला ..ok ok म्हणाला..
थोडं अंतर पुढे गेल्यावर माना पुल्स मधला नदी भाग लागला , तेवढ्यात मॅश म्हणाला this is the place for wundu pack of wild dogs .. आज संध्याकाळीच परत wild dog मिळतात की काय अशी शंका ( अपेक्षा ) मनात आली. पण तेवढं नशीब नव्हतं.

एवढ्यात एक मोठा हत्ती झाडाखाली मस्त उभा राहिला जसा काही माझ्या डोक्यातल्या composition साठी पोझ देतोय , मी पटकन गाडी थांबवायला सांगितली आणि खाली उतरलो, मॅश लगेच माझ्या मागोमाग आला , सकाळचा बोस्वेल चा किस्सा त्यानं बघितला होता त्यामुळे मी पुन्हा अगदी जवळ जायचं ठरवेन त्याआधी तो म्हणाला, doc pls dont go very near .. he is not very cooperative ..his name is “long tusk” known to hit others with his long tusk… एकच लांब सुळा असलेला तो हत्ती होता. फार मोठा नसला तरी ज्या ठिकाणी उभा होता त्यामुळे मी माझी “फ्रेम” पूर्ण करू शकत होतो , झाडाखाली उभा असलेला, मागच्या बाजुला झांबिया बाजूचे डोंगर असं मस्त दृश्य कॅमेरा मध्ये साठवून आम्ही थोडे पुढे गेलो तर हत्तीण आणि तिचा पिल्लू पण तिथे असलेला दिसला .. मग काय त्याचे पण काही स्नॅप काढले . नंतर कळलं की तो फ्रेट होता .. माना पूल्स मधला अजून एक आयकॉनिक फिगर असलेला हत्ती.. हा सुद्धा बोस्वेल सारखं झाडांच्या वरच्या फांद्या मोडून खातो, त्यासाठी झाडाच्या खोडावर पाय ठेऊन चढतो.. आमचे फोटो काढून झाल्यावर मॅश नी सांगितलं या long tusk हत्तीने दोन वर्षापूर्वी एका जर्मन फोटोग्राफर वर हल्ला केला होता आणि त्यात त्या जर्मन फोटोग्राफर ला आपले प्राण गमवावे लागले होते . mash आम्हाला कायम धोक्याच्या सूचना देऊन आमचा एकप्रकारे जीव वाचवत होता असा म्हणायला हरकत नाही .

एकंदर नदीचे पात्र पाहून मी मॅश ला विचारलं , इथे अशी जागा आहे का जिथे नदी जवळ जाऊन सनसेट चे फोटो मिळवता येतील.. आणि नदी मध्ये एखादा हत्ती किंवा कोणताही प्राणी दिसेल .. ?  मधु , सलील आणि कौशिक ला कळलं होतं की मी sunset साठी ची नदीकिनारी जागा शोधतोय, मनापूल चे रंग इतके भन्नाट असतात संध्याकाळी की काय विचारू नका.. त्यामुळे sunset च्यां वेळी फोटोग्राफी व्हायलाच हवी .. माश म्हणाला yes doc there is such place ..sunset area … You want to go there ?  of course mash मी म्हणालो. Mash नी अजून एक लालुच दाखवली, if you want to have fish at dinner , you can go and do fishing in river . झांबेजी च्या पात्रामध्ये परवानगी घेऊन मासेमारी करता येते. पण आमच्यातल्या कोणालाही त्यात फारसा रस नव्हता. आम्ही पुढे जात असताना बघितला की बरेच पर्यटक तिथे मासेमारीचा आनंद लुटत होते .

आम्ही ताबडतोब गाडीत बसलो आणि नदी ला डाव्या हाताला ठेवत , किनाऱ्या च्या बाजूने जायला लागलो . वाटेत बबुन, कुडू, एलांड ( सगळ्यात मोठे हरीण) बघत बघत आम्ही नदीकिनारी येऊन पोचलो . झांबेजी नदीचं पात्र खाली दिसत होतं. एक छोटा उंचसखल भाग पायी पार करून आम्ही अगदी किनाऱ्यावर पोचलो. सूर्य नारायणाच्या रंगांच्या उधळणीला अजून वेळ होता .
समोर नदीचं पात्र , त्या पलीकडे झांबिया देशातले डोंगर ,अधे मध्ये असलेले गवताळ बेटं असा मनमोहक नजारा होता .

मी माझी सगळी equipment बाजूला ठेऊन त्या शांततेला आपलंसं करून घेत होतो. नाही म्हणायला हिप्पो चे आवाज अधून मधून त्या शांततेचा भंग करत होते . एकंदर रमणीय वातावरण होतं . त्यात सगळी शांतता भंग करण्याचं काम कौशिक च्या वाक्यांनी केला .. “भाई लोग पेट्रोल का एक कॅन खतंम” म्हणजे आमच्याकडे फक्त ४० लिटर पेट्रोल शिल्लक होतं, त्यात अजून तीन दिवस काढून करिबा ला पोचायचं होतं .. काहीतरी सोय करावी लागणार असा एकंदर दिसत होतं. मनातल्या कॅनव्हास वर कौशिक च्या वाक्याने कोळसा ओढला होता.. तसा ते चींतेच कारण होतं, पण आत्ता विचार करून सनसेट चा माहोल खराब करायला नको असं विचार करत ..” हा ठीक है देखेंगे बाद में” असा त्याला म्हणालो. तेवढ्यात नदीपात्रातून एक हत्ती चालत जाताना दिसला आणि किनाऱ्याच्या अगदी जवळ एक हिप्पो त्याच्या कडे बघत होता ..लांब होता , पण मस्त फ्रेम होती त्यामुळे लगेच फोटो काढून घेतला .

सूर्य आता झपाझप अस्ताला जायला लागला होता त्यामुळे आकाशात नारिंगी, पिवळ्या , लाल रंगांची उधळण सुरू झाली होती . मी सूर्यास्त टिपण्यात बिझी झालो, एकदा का सूर्य खाली जायला लागला की तुम्हाला खूप कमी वेळ मिळतो त्यामुळे पूर्वतयारी आवश्यक असते तरच मनासारखे काम करता येते. 24-120 आणि ७०-२०० वर काम चाललं होतं. आफ्रिकेमध्ये सूर्यास्ताचे रंग खूप जास्त saturated असतात त्यामुळे आफ्रिका मधले सूर्यास्त हे खूप फेमस आहेत, त्यासारख्या गडद आणि फिकट रंगांचा एकत्र खेळ मी अजूनतरी इतर कुठे बघितला नाही . समोरच्या झांबियाच्या डोंगरामध्ये सूर्याने वणवा पेटवला असावा आणि त्यामुळे डोंगराला शहारे आलें असावे अशी पिवळी धम्मक झालेली झाडे दिसत होती . निसर्गातले रंगांचे खेळ याची देही याची डोळा अनुभवत होतो.

रंगांच्या धुळवडीची छटा मागे ठेउन सूर्य झांबिया मध्ये लुप्त झाला. कॅमेरा बंद करून त्या छटा आणि शांत पाण्याच्या थपक्या ऐकत थोडावेळ तिथंच बसून राहिलो. soaking yourself in nature याचा पूर्ण अनुभव येत होता .  थक गया क्या ? कौशिक च्या या प्रश्नाने माझी तंद्री भंग झाली, नही यार बस ऐसेही.. अस म्हणत कॅमेरा घेऊन उठलो . सर मॅश बोल रहा है कल चीताके स्प्रिंग चलेंगे.. इथे हाच पेट्रोल ची अलार्म bell मगाशीच वाजवून गेला आणि आता नवीन काहीतरी …!!  Chitake springs ही माना pools मधली अजून एक जबरदस्त जागा . आणि अतिशय निबीड झाडी , अत्यंत बेभरवशाची रानटी जागा असा म्हणाल तर वावग ठरू नये . तिथे adventure च्या नावाखाली रात्री कॅम्पिंग होतं, आणि रात्र भर फक्त सिंहांचे डरकाळी फोडण्याचे , हत्तींचे चित्कार असा musical इफेक्ट असतो.  आयडिया एकदम भारी होती, पण दोन मोठ्या समस्या होत्या, एक म्हणजे पेट्रोल, आणि दुसरा म्हणजे एन्ट्री फी. आमच्या आधीच्या planning नुसार पेट्रोल आम्ही आणलं होतं, पण आता या नवीन detour मुळे आम्हाला ४० लिट पेट्रोल ची व्यवस्था करणं भाग होतं तरच आम्ही अजून दोन दिवस मनापूल्स थांबून, परत करिबा पर्यंत पोचू शकणार होतो. इथे पेट्रोल मिळवायचं असेल तर इथल्या कॅम्प मध्ये request करून बघावी लागणार.. मॅश ला विचारलं तर तो म्हणाला काहीतरी व्यवस्था करायचा प्रयत्न करू, दुसरा पर्याय म्हणाजे chitake ला जाऊन आल्यावर संध्याकाळी एक सफारी करायची नाही म्हणजे थोडी पेट्रोल बचत होईल. अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी जायचं ठरलं. मधु नी विचारला तिथं जायचं काय फायदा .. मॅश ला विचारल्यावर तो म्हणाला, you people will get to see some amazing scenes and if lucky lions too ..

Lets do it .. मधू, सलील खुश होऊन म्हणले. आता दुसरा प्रश्न होता एन्ट्री पास चा. न्यकासिकाना गेट वर एन्ट्री फी ५०$ भरून पुढे जावं लागतं . आम्ही खूप लवकर जाणार होतो त्यामुळे त्या गेट वर कोणी असणार नाही आणि त्यामुळे ते बंद असणार . आम्ही मेंन कॅम्प वर पोचलो तर ५ वाजताच ते बंद झालं होतं . त्यामुळे तिथे एन्ट्री पास मिळाला नाही. आम्ही मॅश ला latwin ल फोन करायला सांगितला आणि आपण जाताना तिला पैसे देऊ आणि परमिट घेऊ असं करता येईल का विचारलं, latwin तयार झाली , त्यामुळे आमचा सकाळी ६ वाजता गेट क्रॉस करण्याचा मार्ग मोकळा झाला. कॅम्प वर मॅश ला सोडून आम्ही आमच्या कुटी कडे येत असताना दोन भले मोठे हिप्पो रस्ता आडवून उभे होते.. गाडीच्या light मध्ये त्यांचे पण फोटो घेतले.. मनापूल्स मधे याच कारणासाठी संध्याकाळी ७ नंतर फिरायला बंदी आहे .

एकंदर आमची टूर भारी सुरू आहे .. अस एकमेकांत गप्पा मारत , सूप, राजमा , आणि भातावर ताव मारत लवकर झोपायला आपल्या आपल्या tent madhe गेलो. उद्या chitake spring chya तयारी साठी कॅमेरा charging साठी लावले .
क्रमशः..