रेकी आणि सनसेट
चार महिने चाललेल्या तयारीला मूर्त स्वरूप येण्याची वेळ जवळ आली . युद्धावर चाललेला सैनिक ज्या प्रमाणे आपली हत्यारे व्यवस्थित लावून घेतो अगदी त्या प्रमाणेच मी कॅमेरा जोडत होतो. नेताना समान नीट बसावं म्हणून लेन्स, बॅटरी, कॅमेरा ची मेमरी कार्ड ,चारजर, या सारख्या बऱ्याच गोष्टींचा पसारा गादीवर पसरला.आपण कोणता कॅमेरा आणि लेन्स घ्यायची हे तुम्हाला कोणत्या प्रकारची फोटोग्राफी करायची आहे यावर ठरतं. मी यावेळी कटाक्षाने माझी 600 mm ची लेन्स घेतली नव्हती. माना पूल्स मध्ये फोटोग्राफी चालत करायची असल्याने 7 किलो वजन घेऊन चालणे अवडघड होते आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे माझं माना पूल्स ला येण्याचं कारण पूर्ण वेगळं होतं. मला जास्तीत जास्त wildscape वर काम करायचं होतं .प्राण्यांच्या close up पेक्षा त्यांचं वातावरण आणि त्यांचा वावर असलेला परिसर यामध्ये त्यांचे फोटोग्राफ घेणे हे खूप अवघड काम असते, आणि मला नेमकं तेच साधायचं होतं.मी 70-200 f4 , nikond5, nikon d3300 , 24-120 f4 , 10-20 wide angle , आणि गो प्रो 6 अशी सगळी आयुधं घेतली होती. प्रत्येक लेन्स आणि कॅमेरा फोटोग्राफी सुरू करण्यापूर्वी नीट काम करत आहे का हे तपासून बघावं लागतं . याची बरीच कारणे आहेत त्यापैकी अत्यंत महत्वाची दोन कारणे म्हणजे प्रवासामध्ये काही धक्का लागून उपकरण खराब होऊ शकतं, ऐनवेळी बॅटरी, मेमरी कार्ड किंवा दस्तुरखुद्द कॅमेरा याला काही ही होऊ शकतं. दुसरं कारण असे की , ज्या ठिकाणी आपण फोटोग्राफी करणार आहोत तिथे असणारया प्रकाशाचा अंदाज येणं खूप महत्त्वाचं असतं , अन्यथा नेमक्या वेळी आपल्या हातून कॅमेरा सेटिंग गडबडतात आणि महत्वाचा क्षण जसा हवा तसा पकडता येत नाही. wildlife फोटोग्राफी मध्ये ज्याला प्रकाशाचा खेळ आणि प्राण्यांचा क्षण अचूक टिपता आला त्याला ही कला अवगत आहे असं म्हणायला हरकत नाही.या सगळ्या बाबी तपासायच्या म्हणजे आम्हाला एक रेकी चा फेरफटका मारून येणं गरजेचं होतं . रेकी म्हणजे आपण जिथे काम करणार आहोत त्या ठिकाणची नीट माहिती घेणे, तिथे करण्याच्या आणि न करण्याचा गोष्टी समजून घेणे. आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं होतं. माना पूल्स मधले रस्ते, तिथे कोणते प्राणी कोणत्या भागात मिळू शकतात, त्यातले आम्हाला हवे तसे हव्या त्या ” habitat” मध्ये कुठे मिळू शकतात या सर्व प्रकारच्या माहितीचा खजिना मिळवणे गरजेचे होते. माना पूल्स चा आवाका खूप मोठा आहे . 6766 वर्ग किलोमीटर मध्ये पसरली आहे ही युनेस्को हेरिटेज .यातला 2500 वर्ग किलोमीटर चा परिसर झामबेजी नदीलगत च्या पूर क्षेत्रात आहे . महगोनी, वाइल्ड फिग, इबोनी, अकॅसिया, बाओबाब झाडांनी बनलेली अरण्य 12000 पेक्षा जास्त रानटी हत्ती, 60000 पेक्षा जास्त केप बफेलो, हिप्पो, मगरी, लुप्त होत चाललेल्या केप वाइल्ड डॉग , सिंह, चित्ता, बिबट्या आणि असंख्य पक्षी समुदायाचे आश्रय स्थान आहे.या ठिकाणी आमचा कॅम्प हा elephant क्रीक नावाने ओळखला जातो .दुपारचं ऊन होतं अशा उन्हात कॅमेरा नीट चालतो का हे बघण्यासाठी मी तंबू च्या बाहेर येऊन ,समोरच असलेल्या नदीपात्रा जवळ पोचलो, किनाऱ्याला उभा राहून कॅमेरा डोळ्याला लावत सगळा भाग “scan” करत होतो , तेवढ्यात पाण्यात बुडून राहिलेले 2-3 पाण घोडे ( hippopotamus) एवढा वेळ रोखून धरलेला श्वास पाण्यात फुसस करून सोडत, फवारा उडवत पाण्यावर आले. अचानक झालेल्या या हालचालीने मी आपोआपच दोन पावले मागे सरकलो, तसं त्यांच्यात आणि माझ्यात अंतर होतं आणि मी उंचीवर होतो त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नव्हतं, पण पहिलाच सामना असल्याने जरा बिचकलो. मग त्यांच्या वरच फोकस करून ट्रायल घेतली, थोडे फार सेटिंग मध्ये बदल करणे गरजेचे होते ते केले. तेवढ्यात मधू आणि सलील पण त्याचा कॅमेरा ट्राय करत तिथे आले . कौशिक नि पॉईंट एंड शूट च कॅमेरा आणला होता त्याच त्यावर भागणार होतं.चार वाजले होते , आम्ही सगळं समान आत टेंट मध्ये लावून ऑफिस च्या दिशेने गाडीतून निघालो.माना पूल्स ला फोटोग्राफी जरी चालत करायची असली तरी एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला गाडीच वापरावी लागते अन्यथा सगळं चालत करणं आजिबात शक्य नाही. आम्ही नवीन असल्या कारणाने आम्हाला बंदूक धारी गाईड घेणं गरजेचं होतं. माना पूल्स मध्ये नेहमी येणारे काही पर्यटक आम्हाला भेटले त्यांनी कटाक्षाने सांगितलं की रेंजर शिवाय फिरू नका, त्यांना घेऊन फिरलात तर तुम्ही ज्या साठी आला आहात ते काम नक्की होईल. आम्हीही तेच ठरवलं होतं.

5 मिनिटात ऑफिस वर पोहोचलो. दुपारी चेक इन साठी एकदा भेटलो असल्याने तिथले चेहरे ओळखीचे झाले होते. तिथे रेंजर बुकिंग एक दिवस आधी करायला लागतं कारण त्या प्रमाणे त्यांना वर्दी दिली जाते , हे आम्हाला तिथं गेल्यावर कळलं. आता आली का पंचाईत, आताची सफारी कशी होणार असा प्रश्न मधू नि विचारला. मी माना पूल्स चा अंतर्गत नकाशा मिळेल का असा विचारलं, ऑफिस मधल्या लोकांनी लगेच काढून दिला. 5 $ for this, लगेच त्यांनी मागणी केली बहुधा तो प्रशिक्षणार्थी असावा, हो बाबा हो , आम्ही काय पळून जाणार आहोत का असा म्हणलं आणि त्याला5$ दिले.तेवढ्यात ऑफिस चा बॉस आणि तिथली सुपरवायजर आली . आम्हाला काय हवं , आमचे टेंट मिळाले का , जेवण झालं का अशा चौकशा केल्या. Who is your team leader ? तिने विचारलं , I am suppose to be the one , I am dr adwait , असा म्हणत मी स्वतः ची ओळख करून दिली . Are you the one who met with Latwin ranger at nyakasikana gate ? Has anyone of you have lost your wallet ? तिने विचारलंwallet? मी विचारलंYes the one with some.cash and card . i dont think it belongs to us , but i will rechek with my friends मी म्हणालो , बाहेर उभे असलेल्या तिघांना विचारलं तिघांनी नाही म्हणून सांगितलं.No that doesnt belong to us .मी उत्तरलो ती हसत म्हणली yea i know that doesnot belong to you , as latwin said you are from india and you are very friendly and honest guys . I was just rechecking it. हे काय वेडेपणा , असा कोण करतं का , मी मनात म्हणलं. ग्राफीना आमच्याकडे हसत म्हणाली.pls sign the documents before we proceed for booking of guided safari
तो मजकूर वाचून माना पूल्स च गांभीर्य डोक्या पासून करंगळी पर्यंत पसरलं. त्यात असा लिहिला होता , “आम्ही आमच्या जबाबदारीवर “guided walk” करणार आहोत, रेंजर च्या आदेशांचे पालन करणे आमच्यावर बंधनकारक आहे, प्राण्यांना कोणताही त्रास न देता आम्ही फोटोग्राफी करू, यदाकदाचित प्राण्यांने आमच्यावर हल्ला केला तर रेंजर ला त्या प्राण्याला गोळी घालून मारावे लागेल आणि याला आम्ही जबाबदार असू. स्थानीय कायद्यानुसार जी शिक्षेची तरतूद असेल ती आम्हाला लागू असेल, आणि आमची या संदर्भात कोणतीही तक्रार राहणार नाही. ” सगळ्यांनी त्यावर सह्या केल्या , पासपोर्ट नंबर लिहिले ,दुसरा काही पर्याय पण नसतो .आता एवढं सगळं झाल्यावर आपल्याला काय हवं ते त्यांच्या कडून करून घेणं गरजेच आहे हे लक्षात आलं.how many safari do you want to book ? ग्राफीना नि विचारलं for 5 day each full day safari मी सांगितलं मी असा सांगितल्यावर तिने तिच्या बरोबर असलेल्या सहकारया कडे अविश्वासाने एक कटाक्ष टाकला, मी त्यांना सांगितलं आम्हला माना पूल्स मध्ये कशा प्रकारची फोटोग्राफी करायची आहे, आम्हाला जाणकार रेंजर ची गरज आहे, वाइल्ड डॉग, boswell हत्ती, हिप्पो, सिंह, यांची जितकी जवळून फोटोग्राफी करता येईल ते करायची आहे . चेक इन करताना तिथली एक माहिती पुस्तिका मी घेऊन आलो होतो,त्याचं केलेलं वाचन आत्ता उपयोगी पडत होतं. But its imposssible for you to walk all day , and rate is 10$ per hr per person तिने सांगितलं

म्हणजे तासाचे 40 $ असे दिवसाचे किमान 8 तास असे 5 दिवस ,म्हणजे रोजचे 320 $ फक्त सफारी चे . सरकारी दर असल्यानं त्यात कमी होण्याची शक्यता नव्हती ,तरी प्रयत्न करून बघावा म्हणून मी म्हणलं .. Latwin said you will give us group discount if we book all safari in one go and also give experienced ranger.खडा टाकला .. आणि बरोबर लागला I need to talk to officer my boss . ग्राफीना म्हणाली आणि बॉस कडे गेली. काही वेळाने परत आली आणि म्हणाली we will count only 3 persons if you pay all money now . काम झालं होतं हिशेब करून पैसे देऊन पावती घेतली. तिने माझं नाव फळ्यावर लिहिलं आणि 5 दिवसाची गाईड ची नाव लिहीली. उद्या पासून तुमची सफारी सुरू होईल सकाळी 5.30 ला इथे येऊन गाईड घेऊन जाणे. पण आजचं काय हा प्रश्न होताच. can we drive on our own with this map without guide ? मी विचारलं yes you can but you are not supoose to go beyond certain limit . थोडक्यात आम्हाला फिरण्यावर बंधनं होती. जेकब नावाचा आमचा उद्याचा गाईड तिथे होताच. चेहऱ्यावरून हा पटवता येईल असं वाटलं म्हणून त्याला कौशिक नि विचारलं Will you join me for beer tonight . पठ्याचे डोळे विस्फारले, तो हो म्हणला , कौशिक त्याला म्हणला lets go in car and take a round show us something . अशा रीतीने जेकब ला घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो.चार जे पूल्स आहेत त्या पैकी एक ज्याला मेन पूल म्हणतात तिथे गेलो. आमच्या आधीच एक दोन गाड्या तिथे थांबल्या होत्या. मस्त टेबल टाकून पेय पान चालू होतं . मोठ्या रिसॉर्ट च्या मालकांनी या साठी खास परवानगी घेतलेली असते आणि त्यांच्या बरोबर दोन रायफल धारी गार्ड असतात जे आजूबाजूला नजर ठेवून असतात.
त्या तळ्याच्या पलीकडच्या किनाऱ्यावर एक मगर सुस्त होऊन पडलेली होती. जेकब ने दुसरीकडे बोट दाखवलं, तिकडे तर 40- 50 मगरी पडलेल्या होत्या . त्याच्या अलीकडच्या भागांत पाण घोडे पाण्यात डुंबत होते. पण या दोन्ही प्राण्याचे फोटो टिपवेत असा काही वाटलं नाही. फोटोग्राफी करताना तुम्हाला ” फ्रेम” दिसली पाहिजे, नुसता प्राणी दिसला की बडवलं शटर असं करून चालत नाही. हे फोटो नंतर फक्त delete करण्याच्या लायकीचे राहतात. वन्यजीव फोटोग्राफी करताना हा ताबा मनावर असावा लागतो. आपल्याला एवढे सगळे प्राणी दिसतायेत ,आपण या साठी एवढा अट्टाहास करून आलोय हे सत्य असल्याने फोटो काढताना संयम ठेवणं खूप अवघड असते. जेव्हा अधिक संख्येने प्राणी दिसतात तेव्हा मन चंचल होते , काय करू आणि काय नको असं होऊन जातं आणि नेमका हाच चंचल पणा घातक ठरतो. फ्रेम नीट येत नाहीत, आपण इतक्या सुंदर ठिकाणी जाऊन सुद्धा सर्वसाधारण दर्जाचं काम करण्याची शक्यता असते . आणि मी माझ्या आजवरच्या अनुभवातून हेच शिकलो होतो . त्यामुळे मी कॅमेरा बाजूला ठेऊन फक्त तो सगळा निसर्ग स्वतः मध्ये गोळा करत होतो. Many a times you have to sink in the environment rather than clicking images . मधू आणि सलील शटर बडवत होते .. पण मला काहि फ्रेम दिसत नव्हती , मला अपील होत नव्हती असं म्हणू हवं तर. प्रकाशाचा अंदाज घेण्यासाठी एक दोन क्लिक केले. जेकब ला विचारलं इथे कुठे जवळ बाओबाब ट्री आहे का जिथे sunset चा फोटो मिळेल. जेकब नि विचार करून सांगितलं 5-7 मिन वर आहे तिथे जाऊ शकतो. सलील मधू च झालं की आम्ही तिकडे निघालो. सूर्य त्या झाडाच्या आडून खाली जातोय आणि अप्रतिम रंगांची उधळण चालू आहे अशी फ्रेम डोक्यात होती.इथे फोर बाय फोर गाडीच का लागते हे एक मोठी पाण्याची घळ पार करून जवळजवळ काटकोनात असलेला चढ चढल्यावर पटलं. कौशिक त्याचं सगळं कसब पणाला लावून गाडी चालवत होता . इथे रस्त्यात छोटे दगड नव्हतेच होते ते सगळे मोठे धोंडेच. अशा खडकाळ रस्त्यावरून पुढे जात जात आम्हाला समोर बाओबाब चे निष्पर्ण झाड दिसले. बाओबाब हा अति विशाल वृक्ष असतो. शेकडो हजारो वर्षांपासून आफ्रिकेची शान ओळखला जातो. काही वृक्ष इतके मोठे असतात की त्याच्या खोडा मध्ये दोन खोल्या होतील.

बस रुको इधर.. मी कौशिक ला इशारा केला आणि आम्ही खाली उतरलो. सूर्य अजून थोडा वरच होता, त्याला खाली यायला 10 मिन तरी होतीच, अशा वेळी कॅमरा सेटिंग अगदी बरोबर असावी लागतात. हे क्षण पुन्हा येत नाहीत . सूर्याला पुनः सांगू शकत नाही , बाबा रे अजून एक फोटो नीट घ्यायचा आहे जरा परत वरून खाली ये! जे आहे ते आत्ताच आणि आत्ताच्या क्षणातलं पुढच्या क्षणात नाही, प्रत्येक क्षणातली विविधता ही सुद्धा अनोखी… वाह क्या बात है आता रंग उधळायला सुरू झाली, त्या सूर्यास्ताच्या रंगामध्ये काळा बाओबाब असा दिसत होता जणू काही दोन्ही हात पसरून मला आलिंगन द्यायलाच बोलावत आहे, हाच तो क्षण अद्वैत ठोक शटर .. चार पाच फ्रेम टिपल्या. शेजारची झाडे बाओबाब ला अशी टेकून उभी होती जणू सगळे मिळून फेर धरून रंगाच्या उधळणी चा आनंद घेत आहेत. वाह वाह वाह मजा आ गया.. ! अशा वेळी ग्रेस च्या ओळी आपोआप आठवल्या,सुख असे कळीतून फुलते व्यापतो वृक्ष आभाळ छायाच कशा दिसती मग आपुल्यापुरी खडकाळ Its 6.30 we should go back to camp जेकब मला बोलवायला पुढे आला होता . त्याच्या बोलण्याने मी भानावर आलो . yes lets go .. thanks jekab ..! that was wonderul sight .कॅम्प वर” 7 च्या आत घरात” हा नियम असल्याने तातडीने निघालो . जेकब ला मेन गेट ला सोडून त्याच्या बिअर ची व्यवस्था करून आम्ही परत आलो. एकंदर आजच्या दिवसाबद्दल बोलत बोलत गाडी लावून आम्ही तंबू कडे परत येत असतानाच मधू म्हणाला hey adwait see this …looks like something has walked down here ..जवळ येऊन बघतो तर काय … आमच्या तंबू च्या जवळ बिबट्याचे ठसे होते .. मधू ,ये leopard है .. आमच्या गाडीच्या टायर मार्क वर ठसे होते याचा अर्थ असा होता की बिबट्याची हालचाल आमच्या भागात नुकतीच झाली आहे…आणि आता एव्हाना पूर्ण अंधार पडला होता.
क्रमशः