दवाखान्यात आज बराच बिझी होतो त्यामुळे बरेच “मिस्ड कॉल्स ”  मेसेज  येऊन पडले होते . ज्यांना पुन्हा उत्तर देणे गरजेचे होते त्यांना उत्तर देत देत कौशिक च्या मिस्ड कॉल वर येऊन पोचलो.कौशिक चा फोन येऊन गेला म्हणजे दोन गोष्टी असू शकतात …एक काहीतरी झोल आहे नाहीतर काहीतरी भन्नाट गोष्ट आहे .. कौशिक हा एक वेडपट अवलिया …आहे चेन्नई चा…राहतो बेगलोर मध्ये आणि असतो तैवान ला..यावरून काय समजायचं आहे ते समजून घ्या … त्याच्या सोबत केनिया चा उत्तम अनुभव होता… स्वस्तात मस्त कशी tour करायची आणि फोटोग्राफी करण्यासाठी कुठे पोषक वातावरण मिळू शकेल याची उत्तम जाण असलेला मित्र..

त्याचाच मेसेज येऊन पडला होता .sir if  you are interested to join crazy photography adventure pls ping me back…फोटोग्राफी म्हणल्यावरच निम्मा तयार झालो होतो पण कुठं याच उत्तर त्याला पिंग केल्यावर मिळणार होतं.hi kaushik got your message excited to know the details ..asa मेसेज करून मी फोन बाजूला ठेवला आणि कामात पुन्हा गुंतलो .

त्याचे बरेच मेसेज येऊन पडले होते .पण आता रात्री शिवाय बघणं शक्य नाही कारण फोटोग्राफी बद्दल चर्चा सुरू झाली की बाकी सगळा बाजूला पडायचा धोका असतो .आणि कामाच्या जागी असा होणं चांगला नाही. रात्री घरी गेल्यावर निवांत पणे मेसेज बघितले .. sir i want you to join one of the most exciting photography experience on earth …Photographing animals on foot.. walking without vehicle…. At Zimbabwe..Mana pools  i am counting you in ..थोडक्यात मी तुम्ही येणार असा गृहीत धरुनच चाललो आहे आणि आता तुम्ही प्लॅनिंग ला लगा असा इशारा देणारा मेसेज होता.

आई शप्पथ… माना पूल्स.कोणत्याही वन्यजीव फोटोग्राफर च स्वप्न असतं की त्याला प्राण्याच्या जितक्या जवळ जाऊन कॅमेरा मध्ये कॅप्चर करता येईल तितका ते हव असत आणि ते सुद्धा कोणत्याही बंधनाशिवाय… कोणत्याही बंधनाशिवाय प्राण्यांना कसलाही त्रास न देता बघणे, त्यांचा अभ्यास करणे हेच तर हवा असतं. आणि तेच खुणावत होता मला माना पूल्स ला जायला.

माना पुल.. झिम्बाब्वे मधील एक अत्युच्च दर्जाचे , युनेस्को च वर्ल्ड हेरिटेज साईट हा दर्जा प्राप्त असलेले ..एक राष्ट्रीय उद्यान .झांबेजी नदीच्या दक्षिण किनार्यावर असलेले हे विस्तीर्ण अरण्य. झिम्बाब्वे आणि झांबिया या दोन्ही देशांच्या सीमेवर असलेलं एक अफलातून ठिकाण . आता कोणालाही असं वाटणं साहजिक आहे की राष्ट्रीय उद्यान म्हणलं की आपल्या समोर एक ठराविक इमेज समोर येते …गाडीतून बसून प्राणी पाहायचे ..३ तास झाले की परत यायचं … पण माना पूल्स पूर्ण पणे हटके आहे .. तिथं सफारी चालते दिवसभर …सूर्योदय पासून सूर्यास्तापर्यंत..आणि ती सुद्धा चालत…होय होय चालत… आपण हत्ती , hipoo, वाइल्ड dog, crocodiles. अगदी सिंह सुद्धा यांचे चालत जाऊन फोटो काढू शकतो .वाटतंय ना एक्साईटिंग.. ह्म्म अशीच अवस्था माझी झाली होती .. आणि ती पुरेपूर अनुभवली सुद्धा …याबद्दल सविस्तर पुढे सांगेनच.

माना पूल्स हे झिम्बाब्वे च्या उत्तर टोकाला आहे ..आफ्रिकेमध्ये पावसाळा प्रचंड असतो .दरवर्षी पावसाळ्यामध्ये झांबेजी नदीला प्रचंड मोठा पूर येतो आणि त्या पुर क्षेत्रामध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे . “माना ” याचा अर्थ “शोना ” या स्थानीय भाषेमध्ये ४ असा अर्थ आहे .. माना पूल्स म्हणजे ४ तळी.. पण अती प्रचंड आकाराची.. पावसाळ्यामध्ये पूर्ण पणे पुराने वेढलेला भाग पावसाळा संपल्यावर कोरडा व्हायला लागतो आणि जसा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो त्या वेळी पर्यंत पाणी आटून ४ मोठी तळी तयार होतात ज्याच्या किनाऱ्याला सर्व वन्य प्राणी आपला संचार वाढवतात. त्याच दरम्यान आपण त्यांना अगदी जवळून बघू शकतो,त्यांचा अभ्यास करू शकतो ,निसर्गाचा आनंद घेऊ शकतो . ते इतके जवळ येतात की कधी कधी आपल्या तंबू च्या बाहेरच बसलेले असतात. माना पूल्स ची अजून एक खासियत जी फोटोग्राफर च्या दृष्टीने पर्वणी असते ती म्हणजे तिथे मिळणाऱ्या प्रकाशाची सुंदरता.. You get highly saturated hues . अशी रंगसंगती आपण बरेचदा चित्रांमध्ये बघतो ती रंगसंगती याची देही याची डोळा अनुभवू शकतो .विचार करा सूर्योदय वेळी किंवा संधिकली हरणाचे कळप उड्या मारत जात आहेत , हत्तींचे कळप झाडाच्या उंच फांद्या तोडतयेत..आणि जमिनीवर झाडांच्या फांद्या मधून सोनरी ,केशरी रंगाची उधळण झाली आहे ..हे सगळं परी कल्पनेतल जग नाहीये ..हे वास्तवात घडतं.. मी अनुभवल आहे ..आणि कॅमेरा मध्ये बंदिस्त करून घेतल आहे .

आता अशा जागेला भेट द्यायला नकार देणं म्हणजे हातची संधी गमावण्या सारखं आहे . आणि ते मी होऊ देणार नव्हतो.माझ्या पुढे अडचण असते ती म्हणजे किती दिवस आपल्याला द्यावे लागणार आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे प्लॅनिंग .

आता या अशा गोष्टी करायच्या म्हणजे सौ चा भक्कम पाठिंबा ( जो त्या त्या वेळी वेगळा मिळवावा लागतो ..जे फोटोग्राफी साठी बाहेर जातात त्यांना हे नक्की कळेल) असणं गरजेचं आहे .त्यामुळे टूर चे प्लॅनिंग तिथून सुरू होते ..

क्रमशः