एकदाचं पोचलो …

इतका वेळ खिशात असलेला फोन बाहेर काढला , चार मिस्ड कॉल्स , गप्पांच्या नादात कौशिक ने केलेले फोन कळले नव्हते . त्याने केलेलें मेसेज बघितले . अस्वस्थ वाटण्याचं पहिलं कारण कळलं होतं. कौशिक मुंबई वरून आदिसबाब ला पोचलेला होता पण तिथून हरारे ला जाणाऱ्या विमानात तो बसलाच नव्हता.सर मेरा flight मिस हो गया है। i am stuck at adisabab and there is not flight till tomorrow . याचा अर्थ तो एक दिवस उशिरा पोचणार होता . आमचा यांवर विश्वासच बसत नव्हता . दर वेळी अडचणी याच माणसाचा पाठलाग करत यालाच कसा काय गाठतात ? गोंधळ घालणे किंवा होणे हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे हे आम्हाला कळून चुकलं होतं आणि हा आमच्या टूर चा अविभाज्य सदस्य होता . कौशिक चा हा संदेश बरेच गोंधळ बरोबर घेऊन आला होता . त्यानं आमच्या आधी पोचुन हरारे मधील सर्व व्यवस्था बघणं अपेक्षित होतं. त्याच्या कडे अत्यंत महत्वाची खरेदी करण्याची आणि हरारे मधली स्थानिक माहिती काढण्याची जबाबदारी होती जेणे करून आम्ही रात्री 2 ला पोचल्यावर सकाळी ६ वाजता आम्ही माना पूल्स साठी निघणार होतो. आमच्या पैकी कोणाचीच झोप पूर्ण आणि नीट होणार नव्हती त्यामुळे गाडी चालवण्यासाठी ताज्या दमाचा ड्राइवर हा फक्त कौशिक असू शकत होता .आता या नवीन समस्येमुळे बरेच घोळ झाले होते . सगळेजण या मुळे त्याच्यावर भयंकर चिडले होते . आणि ते साहजिक सुद्धा होतं. त्याच्या सांगण्यानुसार तो एअरपोर्ट “सायलेंट एअरपोर्ट” असल्याने गेट बदललेलं त्याला कळलं नाही आणि तो विमानामध्ये बसू शकला नाही .पण एकदा का आपलं सामान विमानात पोचलं असेल तर तुम्हाला घेतल्याशिवाय विमान जात नाही किंवा सामान खाली काढून ठेवलं जातं हा नियम आहे .. असा सलील ठाम पणे सांगत होता . त्याच्यावर अविश्वास दाखवणं शक्य नव्हतं कारण कामा निमित्त तो खूप प्रवास करतो.पण या प्राण्याच्या बाबतीत असा काही झालं नव्हतं , याला खाली ठेऊन विमान त्याच सामान घेऊन उडालं .आता दोनच पर्याय होते एक म्हणजे आम्ही जसा प्लॅन ठरला आहे त्या प्रमाणे 1 तारखेला सकाळी उठून जाणे आणि कौशिक डायरेक्ट माना पूल्स ला पोचेल . याला मधू नाईलाजाने तयार झाला होता कारण अपुऱ्या झोपे मूळे त्याला कसा ड्राइविंग करता येईल याची काळजी होती.दुसरा पर्याय म्हणजे कौशिक येई पर्यंत थांबणे .यात आमचा हरारे मधला सन बर्ड गेस्ट हाउस चा एक रात्रीचा मुक्काम वाढणार होता पर्यायाने बजेट वाढणार , आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेस्ट हाउस पूर्ण “सोल्ड आऊट” होतं, आम्हाला एक दिवस वाढवून मिळण्याची शक्यता कमी होती. कारण या संदर्भात मे अँथनी शी बोललो होतो . या सगळ्या पेक्षा आम्हाला जास्त त्रास देणारा भाग होता तो म्हणजे आमचा अख्खा सफारी चा दिवस वाया जाणार होता. कुठल्याही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ला सफारी वाया जाणे हे सहन न होणारे नुकसान असते.आमच्या चौघांमध्ये एक शांतता पसरली होती.

टूर सुरू व्हायच्या आधीच मानसिकता नाकारात्मकतेकडे झुकणे धोक्याचं असतं.मुद्द्याला हात घालत मी म्हणालो ” आपण कौशिक ला घेऊन गेला तर जास्त बरं होईल ” त्याच सर्वात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे कौशिक एकटा पोचू शकत नव्हता आणि खाण्या च जे काही सामान (रेडी टू इट ) आम्ही इथं ( भारतात) विकत घेतले होते ते सगळं त्याच्या बॅग मध्ये होतं.आमच्या टॅक्सी ड्राइवर ला, कार रेंटल ला विचारून झालं होतं . कोणताही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शक्य नव्हती. अँथनी चा स्वतः चा सल्ला असा होता की आम्ही एकत्र जावं.अँथनी ला आमची एक रात्र वाढवण्याची विनंती केली . त्यावर त्याने काही सांगितलं नाही ,फक्त तो म्हणाला “dr don’t worry , just come down to guest house we will take care of everything”त्याच्या या आश्वासक बोलण्याने थोडा धीर मिळाला. पण बाकी तिघे काही फारसे आश्वासक वाटत नव्हते. पण काही इलाज नव्हता .आम्ही एअरपोर्ट वरच दुपारचं जेवण उरकून घेतलं . हे सगळं होई पर्यंत 3 वाजले होते. बोर्डिंग गेट वर आमच्या विमानाची सूचना लावली होती. 15 मि आम्ही बोर्डिंग करणार होतो. पोटात थोडी भर पडल्यावर आणि आपण आता लवकरच विमानात बसून आपला प्रवास सुरु करणार या भावनेने आमचे चेहरे जरा बरे झाले होते दुपारच्या 3.30 ला आम्ही विमानात बसायला म्हणून आत जायला सुरू केला होता. मी पुढे माझ्या मागे मधू ,सलील ,आणि राज सगळ्यात मागे होता. सारखा फोन बघत होता. आम्हाला वाटलं घरी अपडेट देत असेल प्रवासाची. पुढच्या मिनिटाला तो लाईन तोडून पळत माझ्याकडे आला, त्याचा विडिओ कॉल चालू होता घरीं, तो म्हणाला doc pls talk to the person on phone , she is maid at my house and my mother has gone unconscious … अर्धा मिनिट मला काही सुचलच नाही, नंतर त्या फोन मधल्या व्यक्तीशी हिंदी मध्ये बोलून महिती घेण्याचा आणि प्राथमिक उपचार सांगण्याचा प्रयत्न केला , एकंदर असा दिसत होतं की परिस्थिती गंभीर आहे, त्यांना पाणी वगैरे मारून उठवायचा प्रयत्न करा , कृत्रिम श्वासोच्छ्वास चा प्रयत्न करा , असा सांगत होतो पण काही प्रतिसाद मिळत नव्हता.एकीकडे बोर्डिंग पूर्ण होत आलं होतं आणि ते अधिकारी मला म्हणत होते काही गंभीर असेल तर सांगा आम्हाला त्यांचं सामान विमानातून खाली काढावं लागेल.त्याचा सांगण्याचा “टोन” राज ला कळला असावा ,तो म्हणाला doc i think i have to de board the plane.. i feel there is something terrible wrong with her . त्याच्या डोळ्यात हताश , असहाय , भीती असे सगळे भाव होते . मलाही हताश आणि असहाय वाटायला लागलं होतं . मागच्या अर्ध्या तासात ज्या पद्धतीने घटना घडत होत्या त्या नुसार सगळेच फासे उलट पडत होते राज ला म्हणलं तू निघ , तू अत्ता घरी जाणं आवश्यक आहे . मी त्याला धीर द्यायचं प्रयत्न केला. फोन वर काही अंशी मला कल्पना आली होती त्याची आई आधीच गेली आहे . पण खोटी आशा त्याला चेन्नई ला पोचे पर्यंत तरी कामाला येईल असा वाटलं.कौशिक ला मसेज करून कळवलं आम्ही तू येई पर्यंत थांबतो आहोत , राज परत गेला आहे , त्याची आई सिरीयस आहे .मी मधू आणि सलील विमानात जाऊन बसलो , अतिशय विचित्र अनुभव होता हा सगळा .

आम्ही ठार बंद झालो होतो काही सुचत नव्हतं . आम्हाला सावरायला वेळ हवा होता . मी त्यांना म्हणाल , काहिही घडायला लागला आहे , आपण हरारे ला जाऊन कौशिक येई पर्यंत थांबू , थोडा सावरू आणि मग पुढे जाऊ. दोघे याला तयार झाले कारण सगळ्याच घटनांचा अचानक ताण आला होता.विमानाने नैरोबी कडे झेप घेतली आणि विमानाच्या इंजिनच्या आवाजात माझ्या विचारांचा कोलाहल मिसळून गेला आणि थोड्या वेळाने माझा डोळा लागला.मनातल्या मनात मागच्या काही दिवसांचा घटना क्रम पडताळून पहिला जात होता . राज ला व्हिसा मिळण्यात सगळ्यात जास्त अडचण आली होति, श्रीलंकन पासपोर्ट वर त्याला इ व्हिसा असल्याशिवाय प्रवेश मिळणार नव्हता , पण त्याचा अर्ज काही केल्या पुढे जात नव्हता. कदाचित त्याने जाऊच नये अशी नियतीची ईच्छा होती की काय असा वाटूंन गेलं. पण पुढे काय होणार याची चिंता जास्त वाटू लागली होती. साहजिक पणे बजेट चा पुरता बोजवारा उडणार होता. किमान 500-600 $ चा फटका बसणार होता . टूर सुरू झाली होती , आता मागे फिरणं अशक्य… जे होईल ते होईल.sir would you like to have some coffee ? एअर होस्टेस च्या प्रश्नांनी मला जाग आली. Give me some strong coffee please मी उत्तरलो .मग पुढचा वेळ चित्रपट बघण्यात निघून गेला . लवकरच आम्ही नैरोबी मध्ये उतरलो. भूक लागली होती म्हणून थोडी पोटपूजा करून हरारे ला जाणाऱ्या आमच्या बोर्डिंग गेट वर जाऊन बसलो. आमचा “कौशिक” होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेत होतो. राज चा मेसेज आला होता त्याची आई गेली होती. आम्ही त्याला मिस करणार होतो.अँथनी बरोबर आमचा संपर्क चालू होताच. त्यालाही राज ची कल्पना दिली होती . त्याने कोस्टा नावाच्या गेस्ट हाउस च्या व्यवस्थापकाचा फोन नंबर दिला होता. नैरोबी वरून निघताना आमच्या पिक अप ची खात्री करून घेतली . त्याने पूर्ण सहकार्याच आश्वासन दिलं .

नैरोबी ते हरारे 2 तासाचा प्रवास , रात्री 11 ला सर्व गोष्टी नियमित पार पाडत आमचे विमान वेळेवर निघाले .  आणि आम्ही रात्री 1.30  ला  रॉबर्ट मुगंबे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हरारे ला पोहोचलो. झिम्बाब्वे च्या राजधानीचे विमानतळ असल्याने त्याला साजेसेच होतें. वाइल्ड लाईफ संकल्पनेवर आधारित त्याची मांडणी असल्याने खोटे का होईना प्राणी बघून जीवात जीव आला.
रात्रीची वेळ असल्याने आणि आम्ही आमच व्हिसा च काम आधीच केल्याने ( भारतासाठी visa on arrival आहे)  एमिग्रेशन ला फार वेळ लागला नाही ,ना कसला त्रास झाला. इमिग्रेसशन ऑफिसर ला आम्ही केवळ माना पूल्स ला जाण्यासाठी भारतातून आलो असा सांगितल्यावर  “You photographers are crazy people ”  असा म्हणत पासपोर्ट वर शिक्का मारला. थोडे डॉलर झिम्बाब्वे करन्सी मध्ये बदलून घेतले जेणे करून स्थानीय दुकानात खरेदी करताना अडचण यायला नको. शक्यतो मोठ्या मॉल शिवाय कुठे क्रेडीट कार्ड वापरू नये असा दंडक आम्ही पाळायचा ठरवलं होतं.
एअरपोर्ट च्या बाहेर आम्हाला घ्यायला गाडी हजर होतीच , आणि स्वतः  अँथनी चा भाऊ डेव्हिड जातीने हजर होता. आमच्या एकंदर अडचणी बघून , सौजन्य आणि आम्हाला थोडा दिलासा मिळवा या हेतूने तो स्वतः आला होता. याला म्हणतात व्यवसायिकता. वास्तवीक त्यानी असा केला नसता तरी चालण्यासारखं होतं, आमची कोणती अपेक्षा नव्हती, पण अपेक्षा नसताना एखादी गोष्ट आपणहून केल्याने आमचा त्याच्यावरचा विश्वास दृढ झाला . welcome to zimbabwe , I hope you had good flight, now we will directly go to guest house , your beds are ready , you should take good rest.  असं एका दमात म्हणत डेव्हिड नि गाडी दामटली. 20 मिनिटात
 आम्ही गेस्ट हाउस वर पोचलो. 2.30 वाजले होते . पूर्ण इंग्लिश बांधकाम धाटणी असलेलं टुमदार घर होतें. बघता क्षणीच आवडलं होतं, चला काहीतरी चांगलं घडतंय असा विचार मनात आला ,  पाहिलं वायफाय शोधलं आणि घरी मेसेज केला….. अखेर हरारे ला पोचलो.
क्रमशः