गाइड बदलना पड़ेगा!!

सात वाजून गेले होते , त्यामुळे मेन कॅम्प मध्ये पण कोणी नव्हता , बिबट्याचे ठसे सापडले आहेत हे सांगणार कोणाला. आणि त्याबाबद्दल आणखी माहिती कुठुन मिळवणार . प्रत्येक प्राण्याचा स्वतः चा रोजचा असा एक दिनक्रम असतो, एक ठराविक मार्ग असतो, साधारणपणे तो कधी चुकत नाही हे मला माहित होतं आणि याच वाढीव ज्ञानामुळे चिंता आणि भीती दोन्ही वाटत होतं. मी आणि मधू एका तंबू मध्ये होतो ,सलील कौशिक दुसऱ्या तंबू मध्ये, दोन्ही मधील अंतर साधारण 100 फूट आणि मध्ये आमचा स्वयंपाकघर. तंबू मध्ये एकाच दिव्याची सोय होती आणि दुसरा दिवा म्हणजे मी नेलेला सोलर लॅम्प.  सध्या आत पेक्षा बाहेर दिव्याची गरज होती म्हणून बाहेर लॅम्प लावून ठेवला. प्रकाशाकडे शक्यतो प्राणी येत नाही या समजामधून. समोरच्या नदी पात्रात पाण घोड्यांची हालचाल होतच होती, त्याचा खेळ चालला असावा बहुधा, एकमेकांवर गुरकावण्याचे आवाज येत होते. या अधून मधून येणाऱ्या आवाजशिवाय , पानांची सळसळ, पाण्याची हालचाल इतकाच काय तो आवाज. सोबतीला म्हणून रातकिड्यांचा आवाज सुद्धा नव्हता. आपल्या श्वासाचा आवाज हीच काय ती जवळची सोबत. या अशा वेळी बिबट्या मागून आला ,किंवा बाजूच्या झाडीत बसला असेल तरी आजिबात कल्पना येणार नव्हती. मी डोक्याला टॉर्च लावून सगळा परिसर , सगळी झुडपे स्कॅन  करून  बघीतलं समोरच्या पाण्यात हिप्पो चे डोळे तेवढे चमकले अगदीच आमच्या जवळच्या किनाऱ्यावर आला होता. झाडीत कुठले डोळे चमकताना दिसले नाहीत. धाडस करून मी स्वयंपाकघरात शिरलो, दार आतून लावून घेतल, आणि रात्रीच्या जेवणासाठी, सूप, भात, रेडी टू इट राजमा काढला.  तेवढ्यात मधू आला आणि त्याने पण हातभार लावला.  सर्व प्रकारची भांडी, गॅस, शेगडी, टेबल खुर्च्या , फ्रीझर याची उत्तम सोय होती आणि तिथे दिवा पण होता .जेवण तयार आहे असा त्यांच्या तंबू कडे तोंड करून  मी आतूनच  ओरडून सांगितलं .तेवढ्यात काही झटापट झाल्याचा आवाज आणि प्राण्याचा अस्पष्ट आवाज ऎकायला आला . सलील कौशिक पळत आले . अरे काहीतरी गडबड झाली आहे आमच्या तंबू च्या पलीकडे.बहुतेक प्राण्यांची शिकार झाली असावी . सलील म्हणाला,  yes its definitely a kill , may be by leopard which we were looking for ..कौशिक म्हणाला,बिबट्या जेव्हा शिकार करतो तेव्हा तो इतक्या बेसावधपणे करतो की शिकार झालेल्या प्राण्याला सुदद्धा कळत नाही आपली शिकार कधी झाली हे . त्यामुळेच कदाचित अस्पष्ट आवाज आले असावेत .चारी बाजूला गडद अंधार, बाहेर हिप्पो, नुकतंच ऐकलेलं वर्णन, मागच्या बाजूला हत्तीची हालचाल आणि या सगळ्या मध्ये आम्ही चौघे सूप, भात ,राजमा सगळं एकत्र करून ओरपत होतो, पटकन सगळं आवरून आपल्या आपल्या तंबूत जाऊन झोपायचं  डोक्यात होतं .अशा  अनोळखी ठिकाणी राहण्याचा पहिलाच अनुभव असल्याने फार धाडसी विचार सुद्धा भीतीदायक वाटत होते. सर्वानुमते तंबू च्या बाहेर जी आग पेटवण्याची जागा आहे त्यात आग पेटवून ठेऊ म्हणजे अगदी जवळ कुठला प्राणी येणार नाही असं ठरलं. बरोबर आणलेल्या साजूक तुपाने अग्नी प्रज्वलित केला आणि तंबूत जाऊन झोपलो.

दिवसभराच्या प्रवासाने रात्री कधी झोप लागली, बाहेरून प्राणी येऊन गेले का नाही ;काही कळलं नाही. ठरल्या प्रमाणे सकाळी 5 ला उठलो. बाहेर अजून अंधारच होता. प्रसन्न मनाने बाहेर आलो,  रात्री पेटवलेल्या कॅम्प फायर मध्ये आता फक्त राख उरली होती. हिप्पो निघून गेले असावेत, कसलाच आवाज नव्हता, हवेत छान गारवा होता. त्यांचा तंबूतला पण दिवा लागला होता याचा अर्थ सगळे जागे झाले होते. आम्ही मग चहा घेऊन तयार  झालो आजच्या दिवसासाठी.  मेन ऑफिस ला गेल्यावर काल रात्रीच्या आवाजबद्दल आणि बिबट्या बद्दल सांगू असं डोक्यात ठेऊन तिथे पोचलो.जेकब तयारच होता. जेकब हा गाईड आणि रात्र पाळीचा गार्ड असा दोन्ही काम करायचा.What you want to do today ?  जेकब नि विचारलं, सूर्य प्रकाश चांगला येत होता, फोटोग्राफी साठी सकाळचे पहिले दोन तास उत्तम असतात. त्यामुळे त्याला म्हणलं वाईल्ड डॉग, किंवा हत्ती यांचे त्यांच्या अधिवासमध्ये काही फोटो घेता आले तर उत्तम.त्यांचा बरोबर गाडीतून निघालो, त्याच्या डोक्यात काही वेगळंच असावं , तो आम्हाला बऱ्या पैकी लांबच्या भागात घेऊन गेला. अधे मध्ये एक पण प्राणी दिसला नाही, हत्तीचं शेपूट पण नाही.  एका ठिकाणी गाडी थांबवून आम्ही पुढे चालत जाऊ लागलो.  मध्ये एक दोन पर्यटक भेटले त्यांना काही हालचाल आहे का विचारलं  , तर सगळं शांत आहे असा त्यांनी सांगितलं.  एकंदर आमचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास सुरू होता. आणि जेकब आमचा मास्तर. तिथे असणाऱ्या झाडांची बरीच माहिती तो देत होता. महगोनी, सौसज , अकॅसिया या झाडांची विस्तृत महत्व सांगत होता.  नाही म्हणायला कुडू नावाची हरणे, एलांड, झेब्रा लांबवर दिसत होते पण ” फ्रेम” बनत नव्हती. बोलत बोलत अंदाजे 2 km आत आलो असू.What are we looking for jekab , anything specific ?  मी विचारलं ;  मी तसा नुसत्याच चालण्याला कंटाळलो होतो, त्याच खरं कारण होत ते म्हणजे सूर्य प्रकाश तीव्र व्हायला लागला होता. “फोटोग्राफिक लाईट” निघून गेला की मग फ्रेम ला मर्यादा येतात.  We are just trying to find group of elephants  with tusker  Normally they are roaming near river this time, जेकब नि सांगितलं. What about wild dogs ?  normally they go for hunting in mornig .. मी विचारलं.Not in this area, there are many packs , most prominent wundu pack but they are far away from this . थोडक्यात माझ्या अपेक्षांवर पाणी पडलं होतं.आधी सांगितलं असतं तर तिकडेच गेलों नसतो का ? मी मराठीमधूनच त्याला म्हणलं, त्याच्या कानावरून फक्त हवा गेली. माझा त्रासिक टोन त्याला कळला असावा तो म्हणाला, lets go back to other area ..we will.check on the way for elephants. Ok fine .. मी म्हणालो.परत जाताना वाटेत एक बंदूकधारी गाईड भेटले, एका मोठ्या कॅम्प चे गाईड होते. हाय हॅलो झाल्यावर आम्हाला त्यांनी विचारलं   where do you stay? Gwaya camp, elephant creek मी सांगितलं, Did you hear any voices last night there ? त्यांनी विचारलं yes we did heard some voices around 8 pm near our tent  कौशिक नी माहिती पुरवली.  Yea ,i just stay near by elephant creek ,near goliath camp and the voices you heard were true. leopard made kill yesterday just beside my camp , wild bore was killed within fraction.  हे ऐकल्यावर आम्ही त्यांना सांगितलं आमच्या इथे ठसे होते. आमचा सगळं ऐकून घेतल्यावर ते म्हणाले Yea thats normal route for leopard in this area. Just keep torch and something like a stick with you  as you dont have any guns .! ..just stay alert.. You might see that guy  at night .आम्हाला आनंद पण झाला होता आणि जर भीती पण वाटली. आनंद या साठी की आमचा अंदाज बरोबर ठरला होता. तो बिबट्याच होता.त्या गाईड नि खूप अचूक सांगितलं होतं.  त्यांना विचारल्यावर असा कळलं की ते जवळपास 20 वर्षे या भागात आहेत , पावसाळा सोडला तर सगळा वेळ इथच असतात. साठीच्या आसपास वय असेल, . माना मध्ये असे गाईड बरेच आहेत आणि त्यांचा Elephant conservation  मध्ये खूप मोलाचा वाटा आहे . त्यांच्या बद्दल पुढच्या प्रकरणामध्ये सविस्तर येईलच.त्यांच्या कडून हत्तीच्या हालचाली बद्द्ल काही महिती विचारली पण ते म्हणाले या भागात आत्ता हत्ती नाहीयेत.आम्ही पुन्हा आमच्या मार्गाने चालू लागलो, गाडीत बसून दुसऱ्या भागात जाऊ लागलो.  थोड्या अंतरावर काही हत्ती दिसले, गाडी तिथेच सोडून आम्ही आत चालत गेलो, मला काही फ्रेम मिळतील या दृष्टीने मे पुढे निघालो, जेकब मागून थाम्बवत होता,  dont go near , we will take photo from here ..  ( आम्ही 50 मीटर लांब होतो)  i want to take close photos  मी सांगितलं आणि पुढे गेलो, त्याचं हे असा हटकलेल मला फारस रुचला नव्हता, आणि तो काही पुढे जाऊ देत नव्हता .आम्हाला जमिनीवर झोपून फोटो घ्यायचे होते पण याच्या डोक्यात काही घुसत नव्हता, बराच घाबरलेला दिसत होता. त्यांनी कौशिक ला सांगितलं I dont have rifle , this is air rifle , elepahnt cannot stop with this so ask your friend to stay back .  एवढं सांगेपर्यंत आम्ही एका ओंडक्याचा आडाला लपून समोरून येणाऱ्या हत्तीचे ,मनसोक्त फोटो काढायला सुरू केले होते .कोणत्याही प्राण्याचे जवळून  फोटो काढायचे असतील तर एक काळजी अशी घ्यायची असते ती म्हणजे; आपण आणि प्राणी याच्या मध्ये कोणतातरी आडोसा पाहिजे, चुकून प्राण्याने हल्ला केलाच तर तो आडोसा आपला राखण करू शकतो. एकदा आडोश्या मागे लपला की पुन्हा हालचाल करायची नाही जेणे करून प्राणी आपल्या उपस्थिती मुळे बिथरणार नाही . समोरून येणारा टस्कर आमच्या कडे रोख करून येत होता.  साधारण 30 फूट अंतर राहिलं असेल येऊन थबकला आणि चाल करून येण्याचा पवित्रा घेतला, त्याच क्षणी एक दोन स्नॅप काढले, मस्त जमले, काही वेळ आमच्या कडे रोखून बघत असतानाच मी सगळ्याना सांगितलं कोणीही हालचाल करू नका त्याचा तो जाइल. पाच एक मिनिटात तो अकॅसिया चे पोड्स खात निघून गेला . जेकब हे सगळं आमच्या मागे उभा राहून बघत होता . त्याच लक्ष आजूबाजूला होतं, झाडीतून कोणी येत आहे का ते बघायला, lets go jekab, lets follow the ele, he will surely join his family ,मी असं म्हणताच त्याला कळून चुकलं होतं की हे काही आपल्या प्रमाणे चालणारे लोक नाहीत आपण फक्त याना सरंक्षण द्यायचं काम करायचं आहे. माझं मत फारस बरं नव्हता त्याचा बद्दल, त्याच कारण असं की आपण ज्याला मागे मागे जाणार त्याचा अंगात आपल्या पेक्षा जास्त धाडस आणि स्वतः हुन  , आम्ही न सांगता सफारी चा प्लॅन करायची बुद्धी पाहिजे, इथं नुसता माणूस म्हणून चांगला आहे हा मापदंड कामाचा नव्हता, आमच्या बाकीच्या टीम च मत पण असाच काहीसा होता त्यामुळे कौशिक ला म्हणलं इसको बदलने का टाइम आ गया, इसके साथ हम जिसके लिए आये है वो नही हो सकता।  कौशिक नि सुस्कारा सोडला आणि आम्ही तिथून निघालो.

माझा अंदाज बरोबर ठरला, टस्कर त्याच्या कुटुंबाबरोबर समोरून येत होता, पुन्हा आम्ही एका ओंडक्याचा मागे थांबून हव्या तश्या फ्रेम घेतल्या. बऱ्यापैकी जवळून मिळाल्या . एव्हाना 10 वाजले होते , पुढची सेटिंग लावावी म्हणून आम्ही मेन ऑफिस कडे निघालो.  गाडी चालताना खालून काहीतरी घासत आहे असं जाणवलं, खाली उतरून बघितला तर मोठा लाकडाचा ओंडका फसला होता, कौशिक गाडी खाली गेला आणि झटापट करून तो काढला. पुन्हा गाडीत बसताना लक्ष्यात आलं की डाव्या बाजूच्या मागच्या चाकात हवा खूप कमी झाली आहे . आम्ही हवा कमी करून आलो होतो पण आत आल्यावर पुन्हा भरली नव्हती, गाडी बरोबर असलेला कॉम्प्रेसर चालत नव्हता. आता अली का पंचाईत.   तसाच आम्ही मेन कॅम्प वर पोचलो . तिथं विचारपूस केल्यावर असा कळलं की तिथे फॉरेस्ट चे गॅरेज आहे त्यात मिळू शकेल.  कौशिक ला तिकडं जायला सांगितलं आणि मी दुसऱ्या गाईड चा जुगाड करायला आत शिरलो.तिथे ग्राफीना होतीच, तिला म्हणल  You promised us to give expert but you gave us trainee. Traineee??   ती उद्गारली,  Yes trainee , I wont be able to do work with this guide . I dont have any complaints but we need an expert मी स्पष्ट सांगितलं.  आम्हाला जो अनुभवी गाईड वाटेत भेटला होता त्यांनी आम्हाला टीप दिली होती, “Try to get Mashatini Ranger for you “मी तिला विचारलं  Is mashtini is here and is he available ? तिने चमकून माझ्याकडे बघितलं,  How do you know about Mash  तिने विचारलं,  we have our informers  मी हसत म्हणालो,  You have got your homework right ग्राफीना म्हणाली .We have to shoot the wild dogs anyhow , pls give us someone who has correct idea ,  मी अगदी कळकळीने सांगितलं. I will ask mash if he is free i will allot him for rest of days ग्राफीना म्हणाली.

माना पूल्स मध्ये anti poching centar म्हणजे अवैध शिकारी थोपवणारे केंद्र आहे आणि मॅश हा तिथला प्रमुख होता. आता या लोकांना प्राण्यांच्या हालचालींची चांगली खबर मिळत असते.  म्हणजे आमचं काम अधिक चांगला होऊ शकणार होतं. मी तिथून बाहेर पडून गाडीचा काम झालं का बघायला कॅम्प च्या शेजारी गॅरेज जवळ आलो, तर तिथल्या लोकांनी त्यांच्या कडे असलेला कॉम्प्रेसर आणून सगळ्या चाकात हवा भरून दिली होती,एकंदरच तिथले लोक हे आपणहून मदत करणारे दिसत होते. आमच्या कडच्या कॅमेरे बघून बरेच प्रश्न विचारत होते. आज काढलेले काही फोटो आम्ही दाखवले. आवडले त्यांना. You go with mash त्यातला एक जण म्हणाला . आता ह्या मॅश ची जोडणी करायलाच पाहिजे असा ठरलं. पुन्हा ऑफिस मध्ये जाऊन डायरेक्ट रेंजर ला भेटलो , त्यांना सगळं समजून सांगितलं, आम्हाला या फोटोग्राफी च किती महत्व आहे ते सांगितलं, हर तर्हेने त्यांना पटवले की मॅश आमच्या बरोबर द्या ,एकदाचा तो तयार झाला, आणि त्याने “माशातीनी” ला आमच्या बरोबर द्यायची सूचना ग्राफीना ला केली. आमचा काम झालं, बाहेर आलो तिथे मॅश होताच, त्याला हाय हॅलो,झाल्यावर त्याला वाइल्ड डॉग बद्दल विचारलं, Do you want wild dog ? You dont want lion?  हा म्हणजे आम्हाला गुगलीच होता. आम्ही अधशा सारख म्हणल  we want both अस म्हणल्यावर तो हसून म्हणाला  Lion , we will try but wild dog for sure . pls come to pick me up at 4 pm . माना पूल्स मध्ये वाइल्ड डॉग conservation   मोठ्या प्रमाणात केला जातं त्यामुळे तिथल्या वाइल्ड डॉग ची हालचाल टिपण्यासाठी त्यांना रेडिओ कॉलर बसवल्या जातात आणि त्यांचा वर लक्ष ठेवला जातं. मागच्या काही दिवसात त्यांची काही हालचाल नोंदली गेली नव्हती त्यामुळे एक रेडिओ सिग्नल पकडणारी गाडी त्या भागात जाणार होती, जर काही हालचाल कळली तर मॅश आम्हाला घेउन जाणार होता.  आम्ही न्यामटूसी कॅम्प च्या भागात जाणार होतो, तो भाग सर्वसामान्य पर्यटकांना निषिद्ध आहे . आता आम्ही रेंजर लाच बरोबर घेऊन जात असल्याने आम्हाला ती अडचण नव्हती , नाहीतर 50$ वेगळे त्या साठी मोजावे लागले असते. न्यामटूसी ही एक ओपन कॅम्पिंग जागा आहे जिथं सिंहांचा वावर कायम असतो आणि रात्रीच्या वेळी त्या भागात तंबू लावून धाडसी लोक तिथे राहू शकतात.

आम्ही आमच्या कॅम्प वर परत आलो आणि संध्याकाळी लागणाऱ्या सगळ्या  लेन्सेस घेऊन तयारी करून ठेवली, दुपारचं जेवण म्हणजे पुन्हा सूप, रेडी टू इट भाजी आणि रेडी टू इट रोटी.. खाण्यात लक्ष नव्हतंच, जे आहे ते खाऊन थोडी विश्रांती घ्यायला तंबूत जाऊन पहुडलो.

क्रमशः