जॅक पॉट ..

दुपारी झोपायचा प्रयत्न फारसा सफल झाला नाही. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला झोपू देत नाही.वाईल्ड डॉग बद्दल असाच काहीसं झालं होतं. भारतातल्या जंगलात वाइल्ड डॉग बघितले आहेत , फोटोही काढले आहेत, पण केप डॉग किंवा patchy wolf म्हणजेच आफ्रिकन वाइल्ड डॉग ची गोष्ट निराळीच होती.आफ्रिकन गवताळ प्रदेशात राहणारा आणि कळपाने राहणारा, एकत्र वाढणारा, एकत्र शिकार करणारा हा प्राणी एके काळी सगळीकडे दिसायचा, अगदी वाळवंटात सुद्धा. वाढत्या मनुष्य वस्ती मुळे “man animal conflict” वाढत गेला आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. आपले पाळीव प्राणी खाऊन टाकतील या भीतीने शेतकरी त्यानां फासे लावून, किंवा विष कालवून, किंवा कुंपणाच्या भोवती विद्युत प्रवाह चालू ठेऊन मारून टाकतात. वास्तविक वाइल्ड डॉग नि पाळीव जनावरांवर हल्ला करून मारून टाकले आहे अशा घटना खूपच कमी आहेत. पण त्यांची शिकार करण्यची पद्धत बघितली तर नक्कीच कोणीही त्यांचा नादाला लागण्याच्या फंदात पडत नाही, अगदी सिंह सुद्धा नाही.साधारणपणे 44 माईल्स प्रति तास या वेगाने ते पळू शकतात आणि 770 चौरस किलोमीटर चा परिसर एकावेळी पालथा घालू शकतात .त्यांची पिल्लं जवळ असतील तर ते त्यांच्या गुहेजवळ वावर ठेवतात. भारतात आढळणारे वाइल्ड डॉग हे चॉकलेटी, भुर्या , नारिंगी छटा असणारे असतात, तर आफ्रिकन वाईल्ड डॉग यांच्या अंगावर काळसर चॉकलेटी चट्टे असतात, अधून मधून पिवळट रंगाचे चट्टे दिसतात. यांचे कान गोलाकार असतात. यांच्या पायाला चारच बोटं असतात, यांची उत्क्रांती ही वुल्फ पासून झाली आहे .आफ्रिकन वाइल्ड डॉग IUCN च्या लिस्ट मध्ये endengered म्हणजे लुप्त होऊ लागलेली किंवा झपाट्याने संख्या कमी होत असलेली प्राण्यांची जमात म्हणून नोंद आहे . आफ्रिकेच्या काहीच भागामध्ये ते आढळतात. आणि माना पूल्स हे त्यांचं सुरक्षित अधिवसाच ठिकाण आहे, किंबहुना ते एक कारण होता इथं यायचं.बाकी तिघे घोरत पडले होते त्यांना उठवलं आणि आम्ही मेन कॅम्प वर वेळेच्या आधी पोचलो. मॅश तिथे होताच, वाइल्ड डॉग ट्रॅक करणारी व्हॅन जाऊन अर्धा तास झाला होता पण काही खबरबात नव्हती. १० मिनिटे तिथेच हत्तीचे कळप बघत बसलो. 10 मिन झाल्यावर मॅश ला म्हणलं चला आपण जाऊया तरी पुढे .. lets track lions till then .. असा मॅश म्हणाला. यांच्या कडे वॊकी टॉकी असतात त्यामुळे त्यांना कळू शकतं कुठे काय चालू आहे .आम्ही गाडीत बसून निघालो .. पल्ला बऱ्यापैकी लांबचा होता. ज्या वाटेने आम्ही चाललो होतो तो भाग पर्यटकांना वर्ज्य होता. त्यामुळं रस्ता पूर्ण खडबडीत, मोठे मोठे दगड पडलेले, झाडं तुटून पडलेली होती त्यांना चुकवत गाडी चालली होती.

त्या भागात त्से त्से माशांचा उपद्रव जास्त होता त्यामुळे काचा बंद करायची वेळ आली. थोडया वेळातच आम्ही सपाट भागात आलो , आता पर्यंत बघितलेल्या भागा पेक्षा पूर्ण वेगळं होता, थोडे पक्षी दिसायला लागले, carmine bea eater , हॉर्नबिल, batlur ईगल हवेत उडताना दिसत होते. उंच वाळलेली झाडं, खुरटलेली झुडुपे सोबत होती. मॅश सांगत होता या भागात रात्रीच्या वेळी मोठे मोठे हत्तीचे कळप इथे येतात आणि या आणि या वाळलेल्या झाडावर आपले दात स्वच्छ करतात. हा परिसर नाईट फोटोग्राफी, करायला खुप मस्त होता. माझा हा विचार मॅश ला बोलून दाखवल्यावर तो म्हणाला this is very dangerous area no one comes here , i have seen lions fight , cheetah here at night during anti poaching petrolling.जागा खूप भारी होती, एक दोन फोटो काढून घेतले. समोरची मोठी घळ पार करून पुन्हा एका वेगळ्या भागात येऊन पोचलो, चारी बाजूला पूर्ण गवत, 5-6 फूट उंच . मॅश नि गाडीचा वेग कमी करायला सांगितलं, This is nyamatusi मॅश म्हणाला, we might see lion here .. आम्ही कॅमरा रेडी केला , मॅश ला समोर एक गाडी उभी असलेली दिसली, त्याने इशारा करून विचारलं , त्या ड्राइवर नि हात करून काहीतरी सांगितलं, मॅश म्हणाला they are hiding in tall grass . आम्हाला घंटा काही दिसत नव्हतं. गाईड चे डोळे तरबेज झालेले असतात त्यांना त्यांचा भाग नीट माहीत असतो आणि आपण नवखे असतो त्यामुळे आपल्याला आत कुठे काही लपले आहे हे कळत नाही, आणि म्हणूनच रेंजर घेतल्याशिवाय फिरायला परवानगी नाही. मॅश नि गाडी पुढे घ्यायला संगीतली , पुढे गेल्यावर सपाट जमीन लागली आणि तो गवताचा भाग मागे पडला गाडी पुढेच जात होती मी मॅश ला न राहवून विचारलं are we not waiting for lions .. we need to click them .. I know we are going there मॅश म्हणाला, but they are far away now .. मी म्हणालो, doc just a minute i will take you there .. मॅश म्हणाला, आणि काही सेकंदात त्यांनी गाडी वळवायला लावून एका ठिकाणी उभी केली… आम्ही त्या गवताच्या बरोबर विरुद्ध बाजूला उभे होतो Be ready it will come out now मॅश म्हणाला… आणि पाच एक मिनिटात एक सिहिणं बाहेर आली… wowwww amazing हे एकच उद्गार एकाच वेळी आमच्या तोंडातून बाहेर पडले .. काय दिमाखदार प्राणी असतो हा … पिवळ्या धमक 6 फूट उंचीचा गवतातून पूर्ण वाढ झालेली भली मोठी सिहिणं बाहेर येताना बघणं म्हणजे काय सुख असतं हे ज्यांनी अनुभवला आहे त्यांनाच जाणवू शकतं. आमच्या समोरून जाऊन अगदी समोर असलेल्या झाडाच्या सावलीत जाऊन बसली. अरे काय भन्नाट फ्रेम बनत होती.. आम्ही सगळे आपल्या आपल्या पद्धतीने फ्रेम बनवत होतो. तेवढ्यात मॅश म्हणला One more coming from back .. अजून एक सिहिणं तिला येऊन मिळाली. दोघींच्या एकमेकाना भेटण्याची, प्रेम व्यक्त करण्याचे खूप मस्त क्षण मिळाले. अचानक दोघी उभ्या राहिल्या आणि आळस देत आमच्या कडे चालत येऊ लागल्या , तसे आम्ही गडबडलो, केवळ 5 फूट अंतर राहिला असेल मी लगेच wide angle lens ला शिफ्ट झालो आणि एक दोन क्लिक केले.माझ्या कॅमेरा मध्ये डोळे रोखून बघताना एक फ्रेम मिळाली, त्यावेळी आमची नजरानजर झाली होती, आणि भीतीची एक लकेर मनात उमटली होती. आम्ही गाडीत बसलो असलो तरी 5 फुटांवर एवढा हिंस्त्र जनावर आहे म्हणल्यावर भीती ही वाटतेच, आणि डोळ्यात बघितल्यावर तर हमखासच. sit down lets go मॅश म्हणाला They will go for water now .. याला जसा काही सगळं पुढचं दिसत होता .. त्यांनी सांगितले तशी गाडी घेऊन पुढे गेलो .. एक डबक्यात दोघी जणी पाणी पीत होत्या . काय अप्रतिम दृश्य होता ते . मागे पूर्ण वाढलेली गवताची पाती आणि समोर सिंह पाणी पीत आहेत , backlight फ्रेम होती पण ब्लॅक अँड व्हाइट मध्ये मस्त दिसेल असा विचार तेव्हाच आला. तेवढ्यात एक सिहिण डोके वर काढून आमच्या कडे बघू लागली , आणि माझा कॅमेरा आणि तिची नजर जुळली.. बस्स झालं काम .फ्रेम घेता घेता मॅश ला म्हणालो You are genius man .. तो हसला फक्त आणि म्हणाला .. Let me know when you are done .. wild dogs are located .. त्याच्या या बोलण्याने भुकेल्या माणसाला एक मागोमाग पक्वान्ने वाढल्याचा फील मला आला . दोघी जणी पाणी पिऊन निघून गेल्या आणि आम्ही वाइल्ड डॉग साठी पुढे आलो. कडक फोटो मिळाल्यामुळे आम्ही खुश होतो आणि जास्त खुश होतो कारण मॅश सारखा निष्णात गाईड मिळाला होता .मॅश ला वायरलेस वर मेसेज येत होते , वाइल्ड डॉग चा एक झुंड सापडला होता बहुधा ट्रॅकर लावलेला असावा . गाडी पळवायला सांगत होता कारण थोड्याच वेळात सूर्य मावळतीला लागणार होता ,वाईल्ड डॉग संध्याकाळच्या वेळी आणि सकाळी शिकारी साठी बाहेर पडतात, आणि मॅश च्या सांगण्यानुसार हा झुंड खूप वेगाने पुढं जात होता.आता पुन्हा आमच्या आजूबाजूचा परिसर बदलला होता मोठी झाडं, सपाट जमीन होती, थोडया थोड्या अंतरावर बदलणारा परिसर हे मन पूल मध्ये प्रचंड जीव विविधता असण्याचं कारण आहे.stop stop stop, मॅश ओरडला, wild dogs are just there त्यांनी उजविकडे बंदूक दाखवत सांगितलं. मला तर पहिल्यांदा काही दिसलाच नाही , नीट निरखून बघितल्यावर झाडाच्या सावलीत दोन वाइल्ड डॉग पळण्याच्या पवित्र्यात उभे होते. मी एका बाजुनी गाडीतून खाली उतरलो, गाडीचा आडोसा घेऊन एक दोन स्नॅप काढले , थोडा कॅमेरा मागे घेतल्यावर मला अजून 4-5 वाईल्ड डॉग दिसले , पळत पळत पुढे चालले होते. Are they on a hunt mash , मी विचारलं, .may be , may be not असा तो म्हणाला , त्यांनी लगेच वायर लेस वरून संपर्क करून मेन कॅम्प ला खबर केली. आणि ट्रॅकर वॅन ला विचारून लोकेशन नक्की केल. त्याला काही पक्की खबर मिळाली असावी, get in car ,hurry असा तो तातडीने म्हणाला. आम्ही उड्या मारतच बसलो , गाडी कौशिक नि पुढे दामटली, आमच्या मागे आणि पुढे कुठलीच पर्यटकांची गाडी नव्हती . त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी फोटो काढण्याची मुभा मिळणार होती. अन्यथा जर बाकी गाड्या असतील तर प्रत्येकाला पाहण्याची आणि फोटोग्राफी ची संधी मिळावी यासाठी कोणीही एक जागा पकडून जास्त वेळ थांबू शकत नाही असा नियम आहे आणि तो काटेकोर पणे तिथे पाळला जातो.

मॅश नि एका मैदानासारख्या भागाजवळ गाडी थांबवली आणि माझी बीन बॅग आणि एक कॅमेरा घेऊन खाली उतरला, run doc , there is. pack of wild dogs along with pups .. वाइल्ड डॉग ची पिल्लं पण होती !!… मला काय करू नि काय नको असा झालं. मी समोरच्या गवतातून उडी मारून पुढे गेलो तेवढ्यात दोन पिल्लं माझ्या दिशेनी पळत येताना दिसली , मी तसाच खाली बसलो आणि कॅमेरा रोखून पटापट क्लीक केले,एकतर वाइल्ड डॉग आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो आणि ते पण पिल्लांसकट … हा मोठा जॅक पॉट च होता . केस पिंजरलेल्या अवस्थेंत असलेली पिल्लं खुप भारी दिसत होती, मला अगदी जवळून मस्त फ्रेम मिळल्या.ही न्यामटूसी झुंड होती , कायम या भागात असायची पण मागचे काही दिवस त्यांचा माग लागत नव्हता . आणि आज एकदम 8 चा ग्रुप आणि 3 पिल्लं असा 11 जणांची झुंड होती. पिल्लं आपल्या आई वडिलांना बघुन त्यांच्या तोंडावर उड्या मारत होती, ते त्यांना त्यांनी खायला आणलं आहे का ते बघत होती, उपाशी असल्यानी खूप कर्कश आवाजात ओरडात होती. सारखी बिलगत होती पण बहुतेक आज शिकार झाली नसावी त्यामुळे त्यांच्या कडे काही नव्हतं. ते पिल्लांना दूर ढकलत होती. पिल्लं पुन्हा काही वेळानी जवळ यायची.वाईल्ड डॉग लहान पिल्लांना घेऊन शिकारीला जात नाहीत . त्यांच्या बरोबर झुंडीमधला थोडा मोठा असलेला एखादा सदस्य थांबतो . बाकीची झुंड शिकार करून खाल्लेला मांस साठवून ठेऊन पिल्लांसाठी घेउन येतात. त्यामुळे पिल्लं यांच्या मागे मागे लागत होती. हा सगळा प्रसंग मी जमिनीवर झोपून क्लिक करत होतो. Ground लेवल काढलेल्या फोटोची कमाल काही वेगळीच असते. मी गाडीतून उडी मारून पहिल्यांदा बाहेर पळत गेल्याने मला हवी तशी जागा निवडून फोटो घेता येत होते. माझ्या मागे मॅश रायफल घेउन उभाच होता, आजूबाजूने काही येतं का ते बघत आणि त्याच वेळी मी त्याला विचारत अजून पुढे पुढे जात होतो, अगदी 15 फुटांवर जाऊन झोपून मनसोक्त फ्रेम ठोकत होतो.खूप interactive फ्रेम मिळाल्या. मागच्या बाजूला झमबीया च्या बाजूचे डोंगर होते, वाइल्ड डॉग ना चुकवून हत्ती त्यांच्या पिल्लाला घेऊन चालले होते, आणि वाईल्ड डॉग आलेत म्हणजे काहीतरी शिकार असणार आणि त्यांनी खाऊन राहिलेला भाग संपवण्यासाठी लगेच गिधाडे पण आली.

कसा निसर्गाच समतोल राखुन असतो याचा परिपाठ आम्हाला अनुभवायला मिळत होता. आता ती झुंड दमून झाडाच्या सावलीत विश्रांती घेत होती आणि आम्ही आमचे सेल्फी काढण्यात मग्न झालो. दुसऱ्या कॅम्प चे लोक आले होते त्यामुळे त्यांना आम्ही जागा करून दिली . पण आम्ही जे अनुभवलं आणि कॅमेरा मध्ये बंदिस्त केला ते खूपच एक्सकलूसिव्ह होतं. थोड्या वेळात सूर्य मावळतीला जायला लागला. तसा सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरला. त्या प्रकाशात काही फ्रेम घेतल्या . आता ती झुंड नवीन शिकारीच्या दिशेने जायला तयार होत होती. त्या आधी व्यायाम केल्यासारखे एकमेकांबरोबर खेळत होते. आम्हाला पण उशीर झालेला होता. मॅश नि वेळ झाल्याची सूचना केली, आम्हाला कॅम्प वर 7 च्या आत पोचणं बंधनकारक होतं आणि किमान 45 मिनिटे लागणार होती. नाईलाजाने आम्ही उठलो आणि परत निघालो. बाकीच्या पर्यटकांना सुद्धा त्यानी निघायला सांगितलं.परतीच्या प्रवासात काळोख पूर्ण दाटला होता आणि गाडीच्या लाईट च्या प्रकाशात आम्ही हळू हळू चाललो होतो. मॅश ला कॅमेरा मधेच काही फोटो दाखवले त्याला आवडले, त्यातला एक फोटो त्यांनी स्वतः साठी मागून घेतला जो त्याला नंतर मी इ मेल नि पाठवून दिला. वाइल्ड डॉग च्या कुटुंबाचा फोटो अँथनी ने त्याच्या टूर साठी मागून घेतला, आणि मेन कॅम्प मध्ये सुद्धा लावण्यात आला .

आता आमच्या सफरीचा एक रिदम बसला आहे असा वाटायला लागलं होतं. आजचा दिवस खूप काही पदरात टाकून गेला होता. तंबू मध्ये परत आल्यावर सगळ्या इमेजेस review करण्यात एक तास गेला .. सगळे खूप खुश होते .त्यामुळे सेलिब्रेशन म्हणून आज रात्रीच्या जेवणात उकडॆली अंडी खाण्याचा बेत बनला, सूप, रसम आणि भात, असा पार्टी चा बेत तयार झाला, आणि त्यावर उभा आडवा ताव मारून आजच्या दिवसाचा समारोप केला .
क्रमशः