बोसवेल
टूर ला निघताना केलेल्या लिस्ट पैकी दोन गोष्टी वर टिक झाली होती, वाईल्ड डॉग आणि सिंह.आता माना पूल च्या हत्तींवर लक्ष केंद्रित करायचं ठरलं . रात्रीच्या जेवणावर ताव मारता मारता आज जे काही घडलं आणि अनुभवलं त्याची उजळणी होत होती. या अशा गप्पांचा एक फायदा असतो तो म्हणजे आपण आज कुठे चूक केली ते कळतं आणि पुन्हा ती चुक होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. वाईल्ड लाइफ फोटोग्राफी करताना तुम्हाला एकच संधी असते आणि ती पुन्हा मिळेलच याची काही खात्री नाही, त्यामुळे संधीचे सोने करणे हेच आपल्या हातात असते. जेवताना चर्चा झाली आणि असा ठरलं की उद्याचा सगळा दिवस बोसवेल आणि इतर हत्ती यासाठी द्यायचा.बोसवेल, मानापूल चा स्टार हत्ती, आजमितीस त्याच वय 50 वर्षे आहे, प्रचंड मोठे सुळे  , पण बोसवेल प्रसिद्ध आहे  वेगळ्याच कारणासाठी.आपण हत्तींना सर्कशीत रिंगमास्टर नि चाबकाचे फटके दिल्यावर दोन पायावर उभा राहताना बघितला आहे , सर्कशीतला हत्ती तसं करू शकतो कारण त्याला मारून मारून तस्स करायला शिकवलं जातं.

अन्यथा  4500 ते 6000 kg वजन असलेल्या प्राण्याला त्याचा तोल सांभाळून हे करणं म्हणजे जीववरची जोखीम असते.माना पूल मधल्या काही हत्तींना नैसर्गिक उत्क्रांतीच्या टप्प्यात दोन पायावर उभे राहण्याची कसब मिळाले आहे. आणि बोसवेल हा त्यात आघाडीवर आहे.

बोसवेल दोन पायावर उभा राहून उंच झाडाच्या फांद्या तोडून खातो. 50 वर्षाचा , जवजवळ 5000 किलो वजनाचा बोसवेल 4 फुटाचे दोन सुळे घेऊन जेव्हा दोन पायावर उभा राहून  , स्वतः चा तोल यत्किंचित जाऊ न देता भल्या मोठ्या फांद्या गवत तोडल्यासारख्या तोडतो , ते बघणं हे अत्यंत विलोभनीय, आश्चर्यकारक, आणि देहभान हरपून बघण्याचं दृश्य असतं.साधारणपणे मानापूल मधले  हत्ती जमिनीवर असलेले अकॅसिया ची पोड्स ( शेंगा) , किंवा जवळ असलेल्या फांद्या , गवत खाण्यात धन्यता मानतात. बोसवेल यासारखे अजून 6 हत्ती असे आहेत जे यासारखं कसब आत्मसात करण्याचा जवळपास पोचले आहेत पण बोसवेल सारख कोणीच नाही करू शकत.अभ्यासकांच्या मते हा निसर्गाच्या उत्क्रांती चा एक टप्पा आहे, आपल्या आजूबाजूला असलेल्या अन्नाच्या उपलब्धतेनुसार स्वतः मध्ये जाणून बुजून घडवून आणलेले बदल आहेत.आणि बोसवेल हा त्याचं उत्तम उदाहरण आहे.मानापूल्स ला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या लिस्ट मध्ये बोसवेल हा असतोच.ऑगस्ट नंतर जेव्हा अकॅसिया ची पोड्स तयार होतात तेंव्हा यांची हालचाल सुरू होते . आणि तुम्ही जर नशीबवान असाल तर याची देही याची डोळा आपण ते बघू शकता.चर्चेत ठरल्या प्रमाणे  गजर लावून सकाळी 5 ला उठलो, सकाळचे सर्व कामे आटपून ग्रीन टी चा आस्वाद घेत सगळ्यांची वाट बघत थांबलो होतो. 6 च्या सुमारास आम्ही निघालो आणि मेन कॅम्प ला पोचलो . मॅश तयार होताच ,  त्याला भेटल्ययावर लगेच आजचा प्लॅन बोलून दाखवला,  Any update of boswell mash? मी विचारलं,  umm no , no update of boswell , we seen him 4 days back at main camp  but after that no one has seen him , lets try today , मॅश म्हणाला,बोसवेल ला कॉलर लावली आहे , पण त्यातला transmitter बंद झाला आहे,जे हत्ती अति महत्वाचे आहेत अशा 7 हत्तींनवर तिथे अगदी बारकाईने  लक्ष ठेवले जाते, 7 पैकी 4 हत्तींना बोसवेल सारखं दोन पायावर उभा राहण्याचा,  किंवा झाडावर चढण्याचा प्रयत्न करत उंच फांद्या तोडता येतात, बाकी तीन हत्तीचे सुळे अतिशय तीक्ष्ण आणि मोठे आहेत त्यामुळे त्यांची शिकार होण्याचा धोका आहे , म्हणून त्यांना कॉलर लावली आहे. मॅश आम्हाला ही माहिती पुरवत होता.Then how to locate boswell , मी अधिरपणे विचारलं, we will keep on roaming near acasia trees and along river side , we may get some clue, मॅश म्हणाला,आम्ही गाडीत बसलो आणि निघालो, सकाळची वेळ असल्याने माना पूल्स मध्ये उत्तम प्रकाश पसरला होता, थोड्या अंतरावर हत्तीचा कळप व्यायाम करताना दिसला.

हत्तीचा व्यायाम म्हणजे झाडाच्या मोठया मोठया फांद्या उचलणे आणि आपल्या सुळ्यात पकडून कडाकड मोडून टाकणे. आम्ही थांबलो, गाडीतून खाली उतरलो, खाली उतरताच मॅश नि वॉर्निंग दिली की कोणीही त्याने इशारा केल्याशिवाय हत्तीनच्या जवळ जाणार नाही, आम्ही तिथूनच काही फ़ोटो घेतले, तेवढ्यात माझी नजर मागच्या रस्त्यावर गेली, धुळीचे लोट उडवत  एक हत्तीण त्याच्या पिलाला घेऊन चालली होती, थोडी पुढं जाऊन थांबली आणि रस्त्यावरची माती घेऊन अंगावर उडवू लागली, त्याला डस्ट बाथ अस म्हणतात, सकाळच्या वेळेची सूर्य किरणं, उंच झाडाच्या आडून येत , तो सगळा भाग  नारिंगी, पिवळ्या रंगांच्य छटानी भरून टाकत होती, आणि त्यात हत्ती त्यांचा पिला समवेत धूळ उडवत होता, काय विलोभनिय दृश्य होतं ते.. खूप जबरदस्त फ्रेम मिळाल्या , या अशा फ्रेम फुल्ल साईज मध्ये प्रिंट करून भिंतीवर लागल्या की सगळं माहोल बदलून टाकण्याची किमया त्यात असते. चला आजची सुरवात तरी मस्त झाली असा म्हणत आम्ही पुढं निघालो.

वाटेत एक दोन गाड्या दिसल्या त्यांना मॅश ने बोसवेल संदर्भात विचारलं एकाने सांगितले की तो नदी कडे गेला आहे, मॅश म्हणाला, जर तो नदीकडे गेला असेल तर आपल्याला कदाचित नाही मिळणार, कारण त्याची सवय होति की नदीकडे गेला तर नदीपालिकडे झांबीया मध्ये जातो , तिथे काही वेळ राहतो आणि परत फिरतो. आता हे वन्यजीव मन मौजी असतात, त्यांना वाटेल तेव्हा, वाटेल तिथे फिरत रहातात, त्यामुळं त्याचा ठराविक फिरण्याचा भाग जरी माहीत असला तरी त्यांच्या वेळेबद्दल काही खात्री देता येत नाही.हे ऐकून जरा मन खट्टूच झालं.  पण म्हणतात ना उम्मिद पर तो दुनिया कायम है!आम्ही जो हत्ती दिसेल त्याला बोसवेल म्हणायचो आणि मॅश त्याला नाकारायचा. 12000 हत्ती मधून नेमका तो हुडकायचा ते सुद्धा  प्रचंड विस्तीर्ण भु भागात हे फार मोठं कर्मकठीण काम होतं.बोसवेल च्या गळ्यात कॉलर होती पण लांबून कॉलर दिसत नाही, आणि आफ्रिकन हत्ती सगळेच खूप मोठे असतात आणि बऱ्यापैकी सगळ्यांना सुळे असतात. How to identify him मी न राहवून विचारलं,look at tail of elepahant, boswel has Cut tail.बोसवेल ची शेपूट कशी तुटली, मी विचारलं,It was caught by Crocodile when he was young and was crossing river .आता आमचं लक्ष शेपूट तुटलेल्या हत्तीला शोधण्यात लागलं. तेवढ्यात एक गाडी आमच्या शेजारी येऊन थांबली , त्यातून साठी पार केलेला , माणूस मॅश बरोबर बोलू लागला, दोघांच्या चर्चे नंतर एवढं कळलं की बोसवेल अकॅसिया चे पॉड खात त्याच्या कुटूंबाबरोबर फिरतोय.Who was that mash मी विचारलं , He is stretch ferrerira owner of goliath camp .स्ट्रेच हा माना पूल्स मधला सगळ्यात जुना आणि अत्यंत अनुभवी गाईड , naturalist आणि कॉन्व्हेर्वशनईस्ट.आयुष्यचा  अर्ध्या पेक्षा जास्त काळ त्यांनी माना पूल्स मध्ये व्यतीत केला आहे.जंगली हत्तींना शिकारी पासून वाचवण्यात यांचं खूप मोलाचं योगदान आहे. बोसवेल आणि त्याच्या बरोबरचे एरीक,Jd,फ्रेट,या हत्तींना लहानपणापासून बघता आलेला एक असामान्य माणूस. हत्ती कितीही रागीट स्वभावाचा असुदे स्ट्रेच त्याच्या जवळ अगदी 5 फुटा पर्यंत जाऊन त्याच्या बरोबर बोलू शकतो आणि हत्ती त्याच्यावर हल्ला करत नाहीत, इतक्या बारकाईने हत्तीचं अनुमान लावणारा हा अवलिया ,याची प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही कारण आम्ही त्यांना भेटायला कॅम्प वर गेलो तेंव्हा ते हरारे ला पर्यटकांना आणायला निघून गेले होते.तर स्ट्रेच नि सांगितल्या प्रमाणे आम्ही अकॅसिया ची झाडं बघू लागलो, मॅश च्या अंदाजानुसार तो नदी बाजूच्या अकॅसिया च्या  झाडा च्या रांगेत असावा.एव्हाना 10 वाजले होते,  फारसं काही घडत नसेल तर उगाच भूक लागल्याची भावना होते तसं आमच झालं होतं.  बरोबर घेतलेली चिक्की तोंडात टाकायला प्रत्येकाला दिली, मॅश ला पण दिली,या लोकांना या अशा गोष्टींचं फार कौतुक आणि अप्रूप वाटतं.wait, मॅश म्हणाला, कौशिक नि गाडी बाजूला घेतली  , मॅश दुर्बिणीतून लांबवर काहीतरी बघत होता,That might be “Bose ” मॅश म्हणाला,आमचे डोळे चमकले ,सगळे पटापट उतरले मी  माझे दोनही कॅमेरा किट आणि बिन बॅग घेऊन उतरलो, जर संधी मिळाली तर जितक्या जवळ जाता येईल तेवढा जाऊन फोटो घायचे होते म्हणून wide angle लेन्स पण खिशात टाकली, मॅश  माझी बीन बॅग घेऊन  पुढे चालू लागला आणि आम्ही त्याच्या मागे.  कोणत्याही प्राण्याच्या जवळ जाताना त्याला सहज दिसणार नाही आणि तो आपल्यामुळे बिथरणार नाही याची खूप काळजी घ्यावी लागते.मॅश नि हात करून आम्हाला थांबवलं, दुर्बिणीतून पुन्हा बघून खात्री केली की तो “तोच” आहे .

बोसवेल सापडला , त्याचा बरोबर दोन छोटे हत्ती सुद्धा होते. हत्तीची नजर अतिशय तीक्ष्ण असते, आम्ही अजून 500 मीटर वर असू तेव्हाच त्यांनी तिथून निघून जायला सुरू केला . मॅश नि आम्हाला खूण केली आणि आम्ही आमचा मार्ग बदलला, आम्ही आता झुडुपाच्या मागून चालू लागलो जेणे करून आम्ही त्यांना दिसणार  नाही.  एक छोटा झुडूप बघून त्याच्या आडोशाला आम्ही थांबलो. मॅश नि आंम्हाला कॅमेरा रेडी करायला सांगितले, मी त्याला म्हणाल मला त्याचा फ़ोटो लो अँगल घ्यायचा आहे , आणि जवळून घ्यायच आहे ,त्यावर तो म्हणाला  it will depend on how he behaves ..lets see come on .बोसेवेल झाडाच्या मागे गेला होता आणि आम्ही सरळ चालत त्याच्या दिशेने जात होतो, 100 फूट अंतरावर आलो असताना त्यांनी दिशा बदलली आणि एकदम समोर आला , आम्ही जागच्या जागी थांबलो, कोणतीही हालचाल न करता,आमच्या कडून काही उपद्रव नाही हे कळताच त्यांनी सोंड वर करून झाडाच्या फांद्यांचा अंदाज घेतला ,तस्स लगेच मॅश म्हणाला  get ready he will stand on two feet now ,असा सगळा एका क्षणात होत असत त्यामुळे कायम कॅमेरा रेडी ठेवावं लागतो,  आम्ही आहे तिथे बसून फ्रेम बघत होतो, मला फ्रेम पटत नव्हती, मी मॅश ला म्हणल  i am  going to next bush  असा म्हणलो आणि त्याच्या होकार नकाराची वाट न बघता अजून थोडा पुढे पण बोसवेल ला कळणार नाही अशा पद्धतीने जाऊन बसलो, आता मी बऱ्यापैकी फ्रेम बनवू शकत होतो, आणि बोसवेल नि वरच्या फांदीला पोचण्यासाठी म्हणून समोरचे दोन्ही पाय उचलले, आणि अक्षरशः दोन्हीं पायांवर ताठ उभा राहून वरची फांदी काडकन मोडली आणि खाली खेचली, हा सगळा फक्त 20 सेकंदाचा खेळ होता , दणकून शटर बडवली गेली, आणि “फ्रेम बाय फ्रेम” नजारा कैद झाला.

हत्ती हा हुशार प्राणी समजला जातो पण तो अतिशय शास्त्र शुद्ध हुशार आहे हे मला तंतोतंत पटलं.  त्याचा उभं राहिल्यानंतर चा स्टान्स बघितला तर त्यांनी आपलं वजन ”  center of gravity”  भोवती अतिशय संतुलित ठेऊन , हा प्रकार केला होता.  अफाट होतं ते दृश्य..बोसवेल बरोबर असलेले दोन छोटे हत्ती थोडे रागीट होते, त्यामुळे आम्हाला हुसकवण्याचा प्रयत्न करत होते. बोसवेल नि तोडून दिलेली फांदी खाण्यात ते मग्न झाले तेवढ्यात आम्ही झाडाच्या दुसरया बाजूला जाऊन खाली बसलो. असा अंदाज होता की बोसवेल अजून एकदा फांदी  तोडण्यासाठी या बाजूला येईल आणि आम्हाला समोरून लो अँगल मिळेल.मी 70-200 आणि 24-120 घेऊन तयार होतो.अपेक्षेप्रमाणे बोसवेल चालत आमच्या कडे आला , एक वेळ अशी आली की आमच्यावर चाल करतो का काय अस वाटलं, मॅश माझ्या मागेच उभा होता ,बोसवेल पुन्हा दोन पायावर उभा राहिला आणि भली मोठी फांदी तोडली, आणि धाडकन पाय जमिनीवर टेकले, मी इतका जवळ होतो की त्या फांदी तोडण्याचा आणि त्याने पाय टेकवण्याचा आवाज आजही कानात बसला आहे, त्याने पाय टेकवल्यावर उडालेली धूळ आमच्या कॅमेऱ्यावर आली आणि माझा त्याच्या पुढ्यात ठेवलेल्या कॅमेराचा अँगल बदलला. मला ते लक्षात आलं, आणि मी मॅश ला सांगितलं  i want keep my camera closer to him ,  you are already very close to him , its dangerous , mash please just a little bit  मी  विनावणी च्या स्वरात म्हणालो कारण मला माझी कृष्ण धवल फ्रेम दिसत होती,पूर्ण फ्रेम भरून हत्ती आणि तो सुद्धा लो अँगल, मॅश काहीसा चिंतीत होऊनच हो म्हणाला, just be careful keep an eye on him and slide your camera, dont rise or lift your camera, मॅश म्हणाला,मी 5 टन वजनाच्या बोसवेल पासून जेमतेम 10 फुटांवर असेन, मी खाली झोपलेला , त्याच्या कडे बघत माझा कॅमेरा पुढे सरकवतोय, आणि बोसवेल माझ्याकडे बघत फांदी तोंडात घालतोय, मी अँगल नीट करायचा प्रयत्न करतोय आणि एकाक्षणी बोसवेल स्तब्ध होऊन माझ्याकडे रोखून बघू लागला, त्या क्षणाला मॅश ओरडला   doc get back he will charge now  मॅश ने मागून बंदुकीवर जोराने हात मारला त्या आवाजाने त्यांची तंद्री भंग झाली आणि पुढंच्या क्षणाला त्याने सोंड आमच्या दिशेने करून वास घेण्याचा प्रयत्न केला .. त्याची सोंड आमच्या पासून5 फुटांवर अली होती, आम्ही स्तब्ध असल्याने काही हालचाल न केल्याने आमच्या पासून काही धोका नाही असा कळल्यावर त्यानं सोंड मागे घेऊन थांबला, मॅश नि  इशारा केल्यावर आम्ही तसेच झोपून मागे सरकत मोठ्या झाडाच्या आड आलो. या सगळ्या जोखमी मध्ये  आम्ही एक गोष्ट पाळली होती ती म्हणजे आम्ही अत्यंत शांत राहिलो आणि कसलाही गडबड आवाज अजिबात केला नाही, आमच्या कॅमेऱ्याच्या शटर चा आवाज असेल तेवढाच .. पण तो जो काही अनुभव आम्ही घेतला तो आज आठवला तरी काटा येतो, केवळ मॅश होता म्हणूनच हे करू शकलो.

फोटोग्राफी च पूर्ण समाधान काय असत ते त्या क्षणात आम्ही अनुभवलं होतं. आम्ही मागे सरकलो होतो पण पूर्ण मागे गेलो नव्हतो , ये दिल मांगे मोअर अस्स झालं होतं आम्हाला पण बोसवेल बरोबर असलेले दोन तरुण हत्ती मात्र आता शांत राहण्याच्या मनःस्थिती मध्ये नव्हते, त्यातला एक हत्ती कधी दुसऱ्या बाजूला जाऊन आमच्या कडे तोंड करून उभा राहिला होता हे  आम्हाला कळलंच नव्हतं, मॅश अष्ट अवधानी असल्यांने त्याने ते बघितलं होतं, त्याने आम्हाला ताबडतोब इशारा केला आणि सांगितलं आपण ताबडतोब इथून लांब जायला पाहिजे , आम्ही लगेच मागे सरकलो आणि ते बघताच बोसवेल आणि कुटुंब दुसऱ्या बाजूला जायला निघाले,मी आनंदाने मॅश ला मिठी मारली , आणि त्याला त्यातून कळलं असावं मला काय म्हणायचं आहे, आम्ही चौघेही अत्यंत “Thrilled” अवस्थे मधे होतो.आजचा दिवसच काय पूर्ण “अट्टाहास” सार्थकी लागला होता.

घड्याळाकडे बघितला तर दुपार चे 12.30 वाजुन गेले होते , आम्ही जवजवळ दोन तास शूट करत होतो .Lets go back to camp मॅश म्हणला, आम्ही कॅम्प वर जायला निघालो, वाटेत अजून एक दोन हत्तीचे झुंड होते पण आता लगेच थांबून फोटो घेण्याच्या मानसिक अवस्थेंत आम्ही नव्हतो त्यामुळे त्यांना तसेच सोडून , मॅश ला मेन ऑफिस कॅम्प  सोडून आलो.टेंट मध्ये येऊन स्वतःला बेड वर टाकून दिला आणि आपण काय काय केला ते क्षण पुन्हा कॅमेरा मध्ये डोकावून बघून घेतले..काय अफाट “perspective” मिळाले होतें . वा मजा आली, नकळत फोटो वर मधल्या तारखेवर लक्ष गेलं 4 सप्टेंबर  गणपती बसून 2 दिवस झाले असतील, आपल्याला बाप्पानेच दर्शन दिला आणि हे बाप्पानेच करवून घेतलं ही भावना मनोमन सुखावून गेली.आम्ही सगळे बऱ्यापैकी दमलो होतो , बोसवेल च्य नादात बराच व्यायाम घडला होता त्यामुळे दुपारची झोप आणि थोडी विश्रांती गरजेची होती, त्यामुळे  रेडिमेड  मॅगी पोटात ढकलून थोडा वेळ आडवे झालो..

क्रमशः