तस पाहायला गेला तर माझ्यासारख्या दांत कोरून ( दात सुशोभित हे जास्त बरं वाटत वाचायला )  पोट भरणाऱ्या माणसाला उद्योग व्यवसाय वाढवणे आणि तथाकथित उच्चभ्रु  आयुष्य जगणे फार कठीण नाही .. पण म्हणतात ना फोटोग्राफी चा  किडा वळवळला की तुम्ही हलके होऊन जाता ( खिशातून जास्तच हलके होता ) . व्यवसायाने dental surgeon असलो तरी माझा पिंड हा फोटोग्राफर चा ,आणि त्यातल्या त्यात वन्यजीव आणि पक्षी हा माझा आवडता प्रांत .

वाईल्ड लाईफ फोटो ग्राफी म्ह्णजे एक अत्यंत उच्च दर्जाचं व्यसन आहे ..आणि ज्याला तर लागला त्याला व्यसनमुक्तीचे सर्व दरवाजे बंद होतात…पण या व्यसनामुळे मला निसर्गातले अनेक अद्भुत गोष्टी अनुभवायला, बघायला आणि अर्थातच कॅमेरा मधून जपून ठेवण्याची संधी मिळाली .निसर्गाच्या मदतीने माणसांच्या मनातले अनेक कंगोरे तपासता येतात असा माझं मत आहे ..माणसांच्या वागण्यातले फरक ,त्यांचा समाजाबरोबर च संघर्ष , वासानेवरची कुरघोडी, सामाजिक सलोखा ..या सारखं बाबी पडताळून पाहता आल्या.  वन्य जीवांच्या रानटी पण बरोबर मी आपसूक पणें माणसाला तोलून बघतो.. आणि त्यात बराचसा साम्य पण सापडतं. तर या निमित्ताने मी ज्या देशांमध्ये फिरलो (झिम्बाब्वे आणि केनिया ) या ठिकाणच्या माझ्या वन्यजीव फोटोग्राफी सफारी दरम्यान काय काय अद्भुत गोष्टी  अनुभवल्या..अचंबित करणारी माणसं भेटली… विचित्र संस्कृती अनुभवली.. याबद्दल सांगेन .

माझी  प्रवासाची पद्दत थोडी वेगळी असते .. मी नेहमी बाय रोड जायचं पसंत करतो कारण त्या मध्ये आपल्याला त्या त्या ठिकाणची संस्कृती भेटत असते जी मला कायमच आपल्याला वेगळा अनुभव देते .  जिथं शक्य नाही तिथं विमान जिथं शक्य असेल तिथं कार..मी तुमच्याशी बोली भाषेमध्ये संवाद साधणे जास्त उचित समजतो त्यामुळे अनुभव जास्त जवळचा वाटतो .

चला तर मग … तयार होऊन बसा लवकरच येत आहे अद्भुत झिम्बाब्वे .. माना पूल… युनेस्को हेरिटेज दर्जा असलेली एक अफलातून जागा .. भेटू लवकरच
क्रमशः

Wildlife Stories -Part 1