About the Book
माना पूल्स युनेस्को ने जाहीर केलेले आणि जतन करत असलेले एक अद्भुत ठिकाण या ठिकाणी येणारा प्रत्येक जण या जागेला भुलला नाही तर नवलच. मी सुद्धा या जागेला भुललो आणि प्रेमात पडलो .एक वन्यजीव छायाचित्रकार म्हणून खूप काही अनुभवता येण्यासारखे इथे आहे. यामुळे आजही लाटवीन, मॅश, आणि ऍंथोनी संपर्कात आहेत. वन्यजीव संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण.आपल्याला आपला नैसर्गिक अधिवास जपायचा असेल तर त्यांच्या अधिवासाचे संरक्षण आधी केले पाहिजे.या गोष्टीवर तिथे होत असलेला प्रामाणिक प्रयत्न हा कोणी एकट्याचा नसून तो सरकार, वन अधिकारी, गाईड, पर्यटक यांच्या योग्य समन्वयाने साध्य झालेला आहे .
About the Author
डॉक्टर अद्वैत यांचे फोटो प्रदर्शन नेहरू आर्ट गॅलरी मुंबई, जहांगीर कला दालन मुंबई येथे नुसतं संपन्न झालंय, असे नव्हे, तर काही फोटोफ्रेम्स प्रदर्शनाला आलेल्यांनी लगोलग विकत घेऊन आनंद साजरा केला. डॉक्टर गेले दोन दशकं, कॅमेर्याच्या मागे आहे. कॅमेरा लेन्स आणि त्याच्याच मागची असीमित बुद्धि केवळ अद्भुत! असं मी म्हणेन. महाविद्यालयात असतानाच हा छंद त्यांना भावला व त्यानंतर डेंटल डॉक्टर हा profession सुरू झाल्यावर तो मनापासून जोपासला. त्यामुळेच डॉक्टर अद्वैत नी अनेक जंगलं पिंजून काढून अनेक अनुभवातून संपन्न होऊन , त्यापैकी एक रानमेवा पुस्तक रूपाने आपल्या भेटीस आणले आहे. माना पूल व प्राणी परिसरातील परिस्थितीत किती गहन अर्थ आणि अभ्यास आहे ते समजेल.
Leave A Comment